AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजीव गांधींच्या मंत्रीमंडळातील ‘या’ मंत्र्याची मोदी सरकारकडून राज्यपालपदी नियुक्ती

मोदी सरकारने (Modi Government) माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांची केरळच्या राज्यपालपदी (Governor of Kerala) नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे आरिफ मोहम्मद खान हे राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री होते. 1986 मध्ये त्यांनी राजीव गांधींच्या शाह बानो प्रकरणातील निर्णयाला विरोध करत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

राजीव गांधींच्या मंत्रीमंडळातील 'या' मंत्र्याची मोदी सरकारकडून राज्यपालपदी नियुक्ती
| Updated on: Sep 01, 2019 | 4:52 PM
Share

नवी दिल्ली: मोदी सरकारने (Modi Government) माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांची केरळच्या राज्यपालपदी (Governor of Kerala) नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे आरिफ मोहम्मद खान हे राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या मंत्रीमंडळात केंद्रीय मंत्री होते. 1986 मध्ये शाहबानो प्रकरणात (Shah Bano Case) तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी संसदेत कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बदलवला होता. त्यावेळी आरिफ यांनी राजीव गांधींच्या या निर्णयाला विरोध करत आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

आधुनिक विचारांचे मुस्लीम नेते अशी आरिफ खान (Arif Mohammad Khan) यांची ओळख आहे. ते मुस्लीम धर्मातील सुधारणांविषयी नेहमीच आग्रही राहिले आहेत. आरिफ मोहम्मद खान यांनी नुकताच तिहेरी तलाकलाही (Triple Talaq) विरोध केला होता. तसेच तिहेरी तलाकसाठी 3 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेलाही पाठिंबा दिला होता.

मोदी सरकारने आरिफ खान यांच्या नियुक्तीसह इतरही काही निर्णय घेतले आहेत. यानुसार कलराज मिश्रा यांच्याकडून हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदाचा कार्यभार काढला आहे. आता त्यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी, बंडारू दत्तात्रेय यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी आणि टी. सुंदरराजन यांची तेलंगणाच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली.

आरिफ मोहम्मद खान कोण आहेत?

आरिफ खान विद्यार्थी दशेपासूनच राजकीय क्षेत्रात सक्रीय होते. त्यांची राजकीय कारकिर्द भारतीय क्रांती दलापासून झाली. 1977 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी ते उत्तरप्रदेशचे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1980 आणि 1984 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले. राजीव गांधींच्या मंत्रीमंडळात त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही मिळाले. मात्र, पुढे शाह बानो खटल्यावरुन त्यांनी राजीव गांधींच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला.

काँग्रसमधून बाहेर पडल्यानंतर खान यांनी जनता दलात प्रवेश केला. 1989 मध्ये ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. जनता दल सरकारमध्ये त्यांनी केंद्रीय उर्जा आणि हवाई वाहतूक मंत्री म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी जनता दल पक्षही सोडला आणि बहुजन समाज पक्षात प्रवेश केला. 1998 मध्ये ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले. 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये देखील प्रवेश केला, मात्र 2007 मध्ये भाजपलाही सोडचिट्ठी देत त्यांनी राजकारणापासून आलिप्त राहणं पसंत केलं. खान यांनी अनेक पुस्तके देखील लिहिली आहेत.

आरिफ मोहम्मद यांनी वंदे मातरमचा उर्दू अनुवाद देखील केला आहे. त्यांनी उर्दूत अनुवादित केलेले वंदे मातरम खालीलप्रमाणे,

तस्लीमात, मां तस्लीमात तू भरी है मीठे पानी से फल फूलों की शादाबी से दक्खिन की ठंडी हवाओं से फसलों की सुहानी फिजाओं से तस्लीमात, मां तस्लीमात तेरी रातें रोशन चांद से तेरी रौनक सब्ज-ए-फाम से तेरी प्यार भरी मुस्कान है तेरी मीठी बहुत जुबान है तेरी बांहों में मेरी राहत है तेरे कदमों में मेरी जन्नत है तस्लीमात, मां तस्लीमात

उर्दू शब्द और उनके अर्थ तस्लीमात-सलाम शादाबी-हरियाली दक्खिन-दक्षिण सब्जे फाम-हरियाली जुबान-भाषा

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.