AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यावेळी वाराणसीतून मोदींविरोधात लढणार नाही, केजरीवालांची माघार

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी म्हणजेच आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाहीत. 2014 ला केजरीवालांनी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढली होती. आप यावेळी उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढणार आहे, मात्र केजरीवाल लढणार नाहीत, असं आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी स्पष्ट केलंय. अरविंद केजरीवाल सध्या […]

यावेळी वाराणसीतून मोदींविरोधात लढणार नाही, केजरीवालांची माघार
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

नवी दिल्ली : आम आदमी पार्टी म्हणजेच आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढणार नाहीत. 2014 ला केजरीवालांनी वाराणसीतून पंतप्रधान मोदींविरोधात निवडणूक लढली होती. आप यावेळी उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढणार आहे, मात्र केजरीवाल लढणार नाहीत, असं आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी स्पष्ट केलंय.

अरविंद केजरीवाल सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री असल्यामुळे लोकसभा निवडणूक लढण्याची कोणतीही योजना नाही. पक्षाचं संघटन ज्या ठिकाणी मजबूत आहे, तिथे आपचा उमेदवार दिला जाईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत उत्तर प्रदेशातील उमेदवारांचा निर्णय होईल, अशी माहितीही संजय सिंग यांनी दिली. वाचावाराणसीतून मोदींविरोधात हार्दिक पटेल मैदानात?

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी वाराणसी आणि गुजरातमधील लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दोन्हीही ठिकाणांहून त्यांचा विजय झाला होता. वाराणसी लोकसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 2004 सालचा अपवाद वगळता 1991 पासून या मतदारसंघात भाजपने विजय मिळवला आहे. 2009 साली इथून भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी विजय मिळवला होता.

2014 च्या निवडणुकीत मोदींना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टक्कर दिली होती. मोदींनी त्यावेळी 581022 म्हणजेच तब्बल 56 टक्क्यांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला होता. तर अरविंद केजरीवाल यांनी 209238 मतं मिळवली होती. इतर पक्षांच्या उमेदवाराचा सुपडासाफ झाला होता. काँग्रेसचे अजय राय यांना 75614, सपा उमेदवाराला 45 हजार, बसपा उमेदवाराला 60 हजार मतं मिळाली होती. मोदींनी जवळपास पावणे चार लाख मतांनी 2014 ला विजय मिळवला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...