बिहारनंतर एमआयएम पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लढणार? असदुद्दीन ओवैसी यांचे संकेत

बिहार विधानसभा निवडणुकीतील (Bihar Assembly Elections 2020) यशामुळे एमआयएम पक्ष आगामी काळात पश्चिम बंगालच्या निवडणुकाही लढणार असल्याची माहिती असदुद्दीन ओवैसी यांनी दिली

बिहारनंतर एमआयएम पश्चिम बंगालमध्ये निवडणुका लढणार? असदुद्दीन ओवैसी यांचे संकेत


नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत (Bihar Assembly Elections 2020) एमआयएमने 5 जागा जिंकल्या. या यशामुळे पक्षातील कार्यकर्ते आणि एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांचा उत्साह वाढल्याचे दिसत आहे. त्यानंतर एमआयएम पक्ष आगामी काळात पश्चिम बंगालच्या निवडणुकाही लढणार असल्याची माहिती असदुद्दीन ओवैसी यांनी दिली. (Asaduddin Owaisi said MIM party will contest upcoming West Bengal elections)

“आम्ही पश्चिम बंगालमधील आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आहोत. आमच्या कित्येक कार्यकर्त्यांना तृणमूल काँग्रेसने तुरुंगात डांबले आहे. कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरायचे की नाही ते ठरणार आहे. उत्तर प्रदेशात आम्ही या आधीही निवडणूक लढवलेली आहे. यानंतरही लढू” असं ओवैसी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलं.

बिहारमध्ये मेहनतीला फळ मिळाले

बिहार निवडणुकीतील यशाबद्दल बोलताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, “पाच वर्षांपूर्वी आमचा पक्ष एकूण 6 जागांवर लढला होता. त्यावेळी आम्ही सर्व जागांवर हारलो होतो. आमच्या पाच उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त झाले होते. त्यानंतर आम्ही मेहनत घेतली. बिहारच्या जनतेशी आम्ही संवाद आणि चर्चा करत राहिलो. त्यानंतर आमच्या मेहनतीला फळ मिळाले. या वर्षी आम्ही 5 जागांवर विजयी झालो.” तसेच यापुढेही आणखी मेहनत घेणार असून जनतेसमोर आमची भूमिका मांडणार असल्याचे ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

Bihar Election Result : बिहारमध्ये एमआयएम किंगमेकर ठरणार? 4 जागांवर विजय, तर एका ठिकाणी आघाडीवर 

Ayodhya verdict : आम्हाला भीक नकोय : असदुद्दीन ओवैसी

मोहम्मद पैगंबरांच्या व्यंगचित्राने प्रचंड त्रास, पण फ्रान्समधील हिंसाचार चुकीचा : असदुद्दीन ओवैसी

(Asaduddin Owaisi said MIM party will contest upcoming West Bengal elections)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI