Ayodhya verdict : आम्हाला भीक नकोय : असदुद्दीन ओवैसी

अयोध्या राममंदिर प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने रामलल्लाच्या बाजूने निकाल दिला आहे. तर सुन्नी वक्फ बोर्डाला अन्यत्र 5 एकर जमीन देणार असल्याचे कोर्टाने सांगितले.

Ayodhya verdict : आम्हाला भीक नकोय : असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली : अयोध्या राममंदिर प्रकरणावर सुप्रीम कोर्टाने रामलल्लाच्या बाजूने निकाल दिला. तर सुन्नी वक्फ बोर्डाला अन्यत्र 5 एकर जमीन अयोध्येत देणार असल्याचे कोर्टाने सांगितले. मात्र या निकालावर ऑल इंडिया मजलिस इत्तिहादुल मुस्लिमीन (एमआयएम) पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin owaisi controversy statement on ayodhya verdict) यांनी आम्हाला भीक नकोय, असं सांगितले आहे.

मी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर खूश नाही. मला संविधानावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही आमच्या अधिकारासाठी लढत होतो. आम्हाला भीक म्हणून पाच एकर जमीन नकोय. सर्वांनी मिळून पाच एकर जमिनीचा प्रस्ताव फेटाळून लावला पाहिजे. आमच्यावर उपकार करु नका, असं ओवैसी (Asaduddin owaisi controversy statement on ayodhya verdict) म्हणाले.

देशातील मुस्लीम समाज उत्तर प्रेदशात पाच एकर जमीन खरेदी करु शकतो. आमची लढाई न्यायासाठी होती. आम्हाला उपकाराची गरज नाही. ज्या लोकांनी 1992 मध्ये बाबरीचा ढाचा पाडला होता. त्यांनीच मंदिर बनवण्याचा अधिकार दिला, असंही ओवैसी म्हणाले.

ओवैसी म्हणाले, मी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डसोबत सहमत आहे. आम्ही हक्कासाठी लढत होतो. आम्हाला पाच एकर जमीन नकोय. आम्हाला कोणत्याही भीकेची गरज नाही. पर्सनल लॉ बोर्डाने जमीन घेण्यासाठी नकार दिला पाहिजे.

दरम्यान, अयोध्या प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टाने एतिहासिक असा निर्णय दिला. वादग्रस्त जागा ही रामल्ल्लाला म्हणजे हिंदूना बहाल करण्यात आली आहे. यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्याचा मार्ग मोकळा झाला. संपूर्ण 2.77 एकर जमीन राम लल्लाची, वादग्रस्त जागेची वाटणी होणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट झाले आहे. सुन्नी वक्फ बोर्डाला अन्यत्र 5 एकर जमीन देणार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं सुन्नी वक्फ बोर्डाकडून स्वागत करण्यात आले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *