AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पॉलिटिकल किडा प्रभादेवीतून येतो का? आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा

"पॉलिटिकल किडा नावाचे ट्विटर अकाऊंट सुरु आहे. हा किडा प्रभादेवीकडून येतो की काय? यावर आमचे लक्ष आहे," असे आशिष शेलार (ashish shelar criticizes sanjay raut) म्हणाले.

पॉलिटिकल किडा प्रभादेवीतून येतो का? आशिष शेलारांचा संजय राऊतांवर निशाणा
| Updated on: Jan 22, 2020 | 7:12 PM
Share

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवरायांच्या रुपात, तर गृहमंत्री अमित शाह हे तानाजी मालुसरेंच्या रुपात दाखवणारे मॉर्फ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले (ashish shelar criticizes sanjay raut) आहेत. पॉलिटिकल किडा या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता. यावरुन भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. “पॉलिटिकल किडा नावाचे ट्विटर अकाऊंट सुरु आहे. हा किडा प्रभादेवीकडून येतो की काय? यावर आमचे लक्ष आहे,” असे आशिष शेलार (ashish shelar criticizes sanjay raut) म्हणाले.

“पॉलिटिकल किडा नावाचे ट्विटर अकाऊंट सुरु आहे. यामागे रोज टीव्ही चॅनल उघडल्यावर स्वत:च स्वत:चे दर्शन देतात. त्यामुळे हा पॉलिटिकल किडा प्रभादेवीतून येतो की काय? यावर आमचं लक्ष आहे,” असा आशिष शेलार म्हणाले.

“गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर वादग्रस्त फोटो आणि क्लिप वायरल करण्याचे प्रकार वाढले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची या देशातील नव्हे तर पृथ्वीतळावरील कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. अशा प्रयत्न करणे शक्य नाही आणि ते योग्य ही नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वायरल झालेली एक क्लिप याचा भाजपाशी काहीही संबंध नाही,” असेही शेलार म्हणाले

“पण गेल्या 3-4 दिवसांत आपण पाहतो आहोत की, सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा फोटो लावून एक नवीन संविधान दिले असे चुकीची पोस्ट व्हायरल केली गेली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तानाजी यांच्याबाबत चुकीची क्लिप आली. सीएएला विरोध करणाऱ्या रॅलीमध्ये शाईनबागमध्ये दिल्लीला जसोदाबेन मोदी गेल्या होत्या, असे दाखवण्यात आले. या तिन्ही क्लिपवर आम्ही एवढे सांगू इच्छितो की, आम्हाला विचारधारेच्या युद्धामध्ये जमिनीवर जे हरवू शकत नाहीत, जे पराभूत करु शकत नाहीत ते ‘आभासी दहशतवाद’ निर्माण करत आहेत. हा भाजपला आणि संघ परिवाराला बदनाम करण्याचा कट आहे,” असेही आशिष शेलार म्हणाले.

नाईट लाईफ म्हणजे किलिंग लाईफ

“राज्य सरकारने नाईट लाईफचा घेतलेला निर्णय नाईट लाईफ नसून तो मुंबईकरांसाठी किलिंग लाईफ आहे. तसेच कमला मिलमधील एफएसआय घोटाळ्याला पर्यटनाच्या नावाखाली नियमित करण्याचा हा डाव आहे,” असे गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केले आहेत.

“मुंबईकरांना हॉटेल, पब, बार, लेडीज बार यांचा त्रास सहन करावा लागतो आहे. त्यामुळे मुंबईकर त्रस्त आहेत. हा त्रास नाईट लाईफमुळे आणखी वाढणार आहे. त्यामुळे आमचा त्याला विरोध आहे. या निर्णयामुळे पोलीस यंत्रणेवर ताण येणार आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे त्याला आमचा विरोधच राहील. सध्याचे सर्व चित्र पाहता हे मुंबईकरांसाठी किलिंग लाईफ आहे,” असेही आशिष शेलार (ashish shelar criticizes sanjay raut) म्हणाले.

शाळांमध्ये संविधान वाचनाला भाजपाचे समर्थन

“केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर संविधानाचा सन्मान करण्यासाठी संविधान दिन साजरा करण्यास सुरुवात केली. त्यापुढे जाऊन संविधानाला 70 वर्षे पूर्ण झाली. म्हणून संसदेच्या संयुक्त सभागृहात एक विशेष सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवली होती. दुर्दैवाने आज राज्यात सत्तेत असलेले आणि केंद्रात विरोधात असलेल्यांनी संयुक्त अधिवेशानावर बहिष्कार टाकला होता. संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय भाजप सरकारच्या काळात झाला. त्याचाच पुढचा भाग म्हणून शाळांमध्ये संविधान वाचन करण्यात येणार आहे. आम्ही या निर्णयाचा स्वागत करतो, असे सांगत आशिष शेलारांनी या निर्णयाचे समर्थन केले.

“देश प्रेमाच्या भावनेतून त्यानंतर जर विद्यार्थ्यांनी ‘भारत माता की जय’ आणि वंदे मातरम् असे म्हटलं तर त्यांच्यावर कारवाई करु नका,” असा टोलाही अॅड. आशिष शेलार यांनी (ashish shelar criticizes sanjay raut) लगावला.

संबंधित बातम्या : 

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला, निंदनीय! भाजपने उत्तर द्यावं : संभाजीराजे

मोदी शिवराय आणि अमित शाह तानाजींच्या रुपात, आता हंगामा करणारे गप्प का? : संजय राऊत

‘त्या’ व्हिडिओशी भाजपाचा संबंध नाही, पक्षाला जाब विचारणे चुकीचे : चंद्रकांत पाटील

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.