‘त्या’ व्हिडिओशी भाजपाचा संबंध नाही, पक्षाला जाब विचारणे चुकीचे : चंद्रकांत पाटील

छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, अशी भाजपाची भूमिका आहे, असे प्रतिपादन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (chandrakant patil on modi shah viral video) केले.

'त्या' व्हिडिओशी भाजपाचा संबंध नाही, पक्षाला जाब विचारणे चुकीचे : चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Jan 21, 2020 | 6:25 PM

मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे छत्रपती शिवरायांच्या रुपात, तर गृहमंत्री अमित शाह हे तानाजी मालुसरेंच्या रुपात दाखवणारे मॉर्फ फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओचा भाजपशी काहीही संबंध नाही. हा व्हिडीओ दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरत नाही, असे स्पष्टीकरण भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (chandrakant patil on modi shah viral video) दिले.

“तान्हाजी चित्रपटाच्या दृश्यांचा वापर केलेला एक व्हिडीओ पोलिटिकल कीडा नावाच्या ट्वीटर हँडलवरून पोस्ट करण्यात आला असला. तरी त्याच्याशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. भाजपा त्या व्हिडिओचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत वापरही करत नाही. भाजपा या व्हिडीओचा निषेध करत आहे. या व्हिडीओवरुन भाजपाला जाब विचारणे अत्यंत चुकीचे आणि खोडसाळपणाचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, अशी भाजपाची भूमिका आहे, असे मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी (chandrakant patil on modi shah viral video) व्यक्त केलं.

सोशल मीडियाच्या बाबतीत कोण काही व्हिडिओ बनवून व्हायरल करेल? यावर कोणाचा निर्बंध असू शकत नाही. हा वादग्रस्त व्हिडिओ अशाच प्रकारे कोणीतरी व्हायरल केला. भाजपाच्या बाबतीत संशय निर्माण करून टीका करण्याचा विषय तयार करण्याचा डाव त्यामागे दिसतो,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

“जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना पुरावे मागतात त्यांना छत्रपतींच्या बाबतीत बोलायचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही,” अशी टीका चंद्रकांत पाटलांनी संजय राऊत यांच्यावर केली.

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. ते एक अद्वितीय ऐतिहासिक राजे होते आणि असे कर्तबगार राजे पुन्हा होणे नाही. त्यांच्या कर्तृत्वामुळे हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. त्यांच्याशी कोणाचीही तुलना होऊ शकत (chandrakant patil on modi shah viral video) नाही,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

संभाजीराजेंचा हल्लाबोल 

पुस्तक झालं आता व्हिडीओ आला. अशोभनीय, असहनीय तसेच निंदनीय. संबंधित पक्षाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी. केंद्र सरकारने चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी, असं ट्विट संभाजीराजे यांनी केलं आहे. “आम्हा शिवभक्तांसाठी महाराज सर्वस्व आहेत. शिवभक्तांच्या भावना तीव्र आहेत. सरकारची जबाबदारी आहे, आमच्या भावनांची कदर करत अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी दक्षता घ्यावी. सर्व राजकीय पक्षांना-कार्यकर्त्यांना विनंती आहे, कोणीही गलिच्छ राजकारणासाठी महाराजांच्या प्रतिमेचा गैरवापर करु नये”. असेही संभाजीराजे म्हणाले.

संजय राऊत यांचा हल्ला

दरम्यान, मोदी आणि अमित शाह यांंचे छत्रपती शिवराय आणि तानाजी मालुसरेंच्या रुपातील फोटो व्हायरल झाल्यानंतर संजय राऊत यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला चढवला.

“छत्रपती शिवाजी महाराज आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या फोटोचा वापर निवडणुकीच्या प्रचार रॅलीमध्ये केला जात आहे. त्यावर आता महाराष्ट्रातील प्रमुख नेते, ज्यांना असं वाटतं की छत्रपतींवर बोलण्याचा त्यांनाच अधिकार आहेत ते गप्प का बसले आहेत? मी त्यांच्या प्रतिक्रियेची वाट बघत आहे”, असा अप्रत्यक्ष टोला शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.