AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तावडे-पंकजांनंतर आशिष शेलारांना केंद्रीय नेतृत्वाकडून नवी जबाबदारी

आशिष शेलार यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली

तावडे-पंकजांनंतर आशिष शेलारांना केंद्रीय नेतृत्वाकडून नवी जबाबदारी
| Updated on: Nov 15, 2020 | 5:53 PM
Share

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांना केंद्रीय नेतृत्वाकडून नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शेलार यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी (Greater Hyderabad Municipal Corporation (GHMC) election) भाजपचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. (Ashish Shelar elected as election co-in charges for the upcoming GHMC election)

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय महामंत्री भूपेंद्र यादव यांची ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका (जीएचएमसी) निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तर कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर, महाराष्ट्रातील नेते आशिष शेलार, गुजरातचे नेते प्रदीप सिंह वाघेला आणि कर्नाटकचे नेते सतीश रेड्डी यांची सहप्रभारी म्हणून निवड केली आहे.

आशिष शेलार यांचा परिचय

  • मुंबईतल्या वांद्रे पश्चिम मतदारसंघाचे आमदार
  • अभाविपच्या मुंबई संघटनमंत्री पदाची जबाबदारी
  • RSS, अभाविप मार्गे भाजपमध्ये दाखल
  • 2002 ला मुंबई महापालिकेत नगरसेवक
  • 2007 मध्येही मुंबई मनपात नगरसेवक
  • मुंबई भाजप अध्यक्षपदाचाही अनुभव
  • (Ashish Shelar elected as election co-in charges for the upcoming GHMC election)
  • 2012 ते 2014 काळात विधानपरिषदेवर नियुक्ती
  • 2015 मध्ये मुंबई क्रिकेट संघटनेच्या उपाध्यक्षपदी
  • 2017 मध्ये शरद पवारांचा पराभव करून MCA चे अध्यक्षपद मिळवले
  • 2014, 2019 मध्ये विधानसभेवर निवड
  • विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांशी जवळीक
  • फडणवीस सरकारमध्ये शालेय शिक्षण मंत्रिपदाची धुरा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बिहार निवडणुकीच्यानिमित्ताने राष्ट्रीय राजकारणात आपली छाप पाडल्यानंतर भाजपकडून महाराष्ट्रातील आणखी काही नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भाजपकडून नुकतीच राज्यनिहाय प्रभारींची नवी यादी जाहीर करण्यात आली.

कोणाला कुठली जबाबदारी?

मराठवाड्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांना मध्य प्रदेशच्या सहप्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर भाजप नेते आणि माजी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे भाजपने हरियाणाचे प्रभारीपद सोपवले आहे. त्रिपुरात डाव्यांची सत्ता उलथवून भाजपचे कमळ फुलवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणाऱ्या सुनील देवधर यांची आंध्र प्रदेशचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

विनोद तावडेंची सेकंड इनिंग; राष्ट्रीय राजकारणात छाप पाडणार?

अनुभवामुळे पक्षाकडून जबाबदारी, भाजप हरियाणाच्या प्रभारीपदी निवडीनंतर तावडेंची प्रतिक्रिया 

(Ashish Shelar elected as election co-in charges for the upcoming GHMC election)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.