AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यपालांच्या ‘त्या’ पत्रावरुन जोरदार घमासान!, पवारांची मोदींकडे तक्रार, तर शेलारांकडून राज्यपालांची पाठराखण

मुंबई: मंदिरं उघडण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं प्रत्युत्तर यावरुन राजकीय घमासान अजूनही सुरुच आहे. राज्यपालांच्या पत्राबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं आहे. तर राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रात काहीच वावगं नसल्याचा दावा भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलाय. राज्यपालांच्या पत्रातील भाषा पूर्णपणे संवैधानिक आहे. तसंच […]

राज्यपालांच्या 'त्या' पत्रावरुन जोरदार घमासान!, पवारांची मोदींकडे तक्रार, तर शेलारांकडून राज्यपालांची पाठराखण
| Updated on: Oct 14, 2020 | 12:40 PM
Share

मुंबई: मंदिरं उघडण्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं प्रत्युत्तर यावरुन राजकीय घमासान अजूनही सुरुच आहे. राज्यपालांच्या पत्राबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं आहे. तर राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रात काहीच वावगं नसल्याचा दावा भाजप आमदार आशिष शेलार यांनी केलाय. राज्यपालांच्या पत्रातील भाषा पूर्णपणे संवैधानिक आहे. तसंच कुणाचाही अवमान करणारी नसल्याचं आशिष शेलार यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातील भाषेवर मात्र शेलार यांनी आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे धर्मनिरपेक्षतेबद्दलची आपली भूमिका लपवत असल्याचा आरोपही शेलार यांनी केलाय. (Ashish Shelar on governor letter to CM)

राज्यातील मंदिरं सुरु करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावरुन शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलं आहे. धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून लगेच सेक्यूलर ठरवून अवहेलना करणार काय? असा सवाल पवारांनी मोदींना केला आहे. त्याचबरोबर राज्यपालाचं वागणं संविधानाच्या चौकटीबाहेरील असल्याची तक्रारही पवारांनी केलीय. यावर शेलारांना विचारलं असता, पवारांच्या पत्रावर आपण भाष्य करणार नाही, आपण तेवढे मोठे नसल्याची प्रतिक्रिया शेलार यांनी दिली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या पत्राला उत्तर देताना खरमरीत शब्दांचा वापर केला आहे. “माझ्या हिंदुत्वाचा आपण जो उल्लेख केला, तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही” अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

‘बत्ती गुल’ प्रकरणी एसआयटी लावा- शेलार

सोमवारी मुंबईसह ठाणे, नवी मुंबईतील वीज पुरवठा अचानक खंडित झाल्यानं मोठी खळबळ माजली होती. याप्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक करुन चौकशी झाली पाहिजे अशी मागणी शेलारांनी केली आहे. जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असंही शेलार म्हणाले.

एकनाथ खडसेंबाबत सावध पवित्रा!

एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित मानलं जात आहे. १७ ऑक्टोबरला खडसे नवी ‘राजकीय घटस्थापना’ करण्याची शक्यता व्यक्त होतेय. याबाबत बोलताना शेलारांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. खडसे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते योग्य भूमिका घेतील, असं शेलार म्हणाले.

संबंधित बातम्या:

धार्मिकस्थळं उघडली नाहीत म्हणून ‘सेक्युलर’ संबोधून अवहेलना करणार काय?; शरद पवारांचे पंतप्रधानांना खरमरीत पत्रं

मुख्यमंत्र्यांचं राज्यपालांना पत्र खेदजनक, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

उद्धव ठाकरे राज्यपालांवर कडाडले, मुख्यमंत्र्यांच्या पत्रातील मोठे मुद्दे

Ashish Shelar on governor letter to CM

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.