AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे तर तिघाडीच्या परावलंबी सरकारचे ‘परावलंबी वर्ष’; आशिष शेलारांचा टोला

राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने सत्ताधारी पक्षांकडून सरकारच्या कामांची जंत्री दिली जात असतानाच विरोधकांनी मात्र सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. (ashish shelar reaction on mahavikas aghadi government one year completed)

हे तर तिघाडीच्या परावलंबी सरकारचे 'परावलंबी वर्ष'; आशिष शेलारांचा टोला
| Updated on: Nov 27, 2020 | 2:28 PM
Share

मुंबई: राज्य सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने सत्ताधारी पक्षांकडून सरकारच्या कामांची जंत्री दिली जात असतानाच विरोधकांनी मात्र सरकारच्या कारभारावर बोट ठेवलं आहे. राज्यातील तिघाडीच्या परावलंबी सरकारने महाराष्ट्राला वर्षभरात परावलंबी केलंय. हे तर परावलंबी सरकार आहे, असा टोला भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारला लगावला आहे. (ashish shelar reaction on mahavikas aghadi government one year completed)

आशिष शेलार यांनी ट्विट करून ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीची परावलंबी वर्ष म्हणत संभावना केली आहे. तिघाडीच्या परावलंबी सरकारने महाराष्ट्राला वर्षभरात परावलंबी केले. कोणतीही कणखर भूमिका नाही, ठोस निर्णय नाही, शेतकरी, कामगार, श्रमिक, बलुतेदार, छोटे उद्योग यांना कसलीही मदत केली नाही… खंबीर आधार नाही… फक्त दुसऱ्याकडे बोट दाखवून रडगाणे गाणारे नेतृत्व दिसले, अशी टीका शेलार यांनी केली आहे.

ठाकरे सरकारला एक वर्षपूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीवरही शेलार यांनी सडकून टीका केली आहे. शाळा, परीक्षा, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रम, आरक्षण सगळ्याबाबतीत संभ्रम आहे. कापूस, धान खरेदी झाली नाही, शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही? याची हमी नाही. अहो, जिथे गणपतीची उंची, लोकल ट्रेनचा निर्णय सुध्दा होऊ शकत नाही. तिथे वर्षपूर्तीचे कसले ‘अभिनंदन’ आणि कसल्या मुलाखती!, असा सवालही त्यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते मुलाखतीत?

  • सरकारला जनतेचे आशीर्वाद आहेत. ईडी आणि सीबीआयची भीती कुणाला दाखवता?
  • सरकारने एक वर्ष पूर्ण केले. सरकार आज पाडू, उद्या पाडू असे बोलले त्यांचेच दात या काळात पडलेत.
  • सीबीआयचा दुरुपयोग होऊ लागतो तेव्हा अशी वेसण घालावीच लागते. ईडी काय, सीबीआय काय त्यावर राज्याचा अधिकार नाही? आम्ही देतो ना नावं, आमच्याकडे आहेत नावं. मालमसाला तयार आहे. पूर्ण तयार आहे. पण सूडाने जायचं का? मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची.
  • सरकार चालवताना कसरत करतोय असं वाटत नाही. कारण काहीही असेल, पण तीनही पक्ष एकमेकांत असे मिसळून गेले आहेत. अगदी अजितदादा आहेत… बाळासाहेब थोरात आहेत, अशोकराव आहेत… कुणाकुणाची नावं घेऊ? नितीनराव आहेत, जितेंद्र आहे, वडेट्टीवार आहे, हसन मुश्रीफ आहेत, नवाबभाई आहेत… सगळ्यांचीच नावं घ्यावीशी वाटत आहेत, पण किती जणांची नावं घेऊ… सगळे माझ्याशी प्रेमाने, आपुलकीने आणि आदराने वागताहेत. (ashish shelar reaction on mahavikas aghadi government one year completed)

संबंधित बातम्या:

Nitin Raut | विरोधी पक्षाकडून महाराष्ट्राची प्रगती रोखण्याचा प्रयत्न, नितीन राऊतांचे भाजपवर टीकास्त्र

सदसदविवेक बुद्धी गहाण ठेवली का? न्यायालयाचे दोन निकाल तुमची कामगिरी सांगते, फडणवीसांचा हल्लाबोल

भगवा उतरवणं सोडून द्या, आधी पालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून बघा; उद्धव ठाकरेंचा भाजपला सल्ला

(ashish shelar reaction on mahavikas aghadi government one year completed)

Follow Us
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; कसं असेल रेल्वेचं वेळापत्रक.
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती
नागपूरच्या पिंक मॅरेथॉनमध्ये अमृता फडणवीस यांची उपस्थिती.
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती
भर उन्हात बिबट्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती.