AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांवर बोलणाऱ्यांची लायकी काय आहे?; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता चंद्रकांतदादांवर हल्ला

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. (Uddhav Thackeray taunt chandrakant patil)

शरद पवारांवर बोलणाऱ्यांची लायकी काय आहे?; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता चंद्रकांतदादांवर हल्ला
| Updated on: Nov 27, 2020 | 6:25 PM
Share

मुंबई: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. शरद पवारांविरोधात बोलणाऱ्यांना कुणी सीरियसली घेत नाही. त्यांची पवारांवर बोलण्याची लायकी काय आहे?, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांना नाव न घेता लगावला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या या टीकेवर चंद्रकांतदादा काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Uddhav Thackeray taunt chandrakant patil)

शरद पवारांना राजकारण, समाजकारण आणि प्रशासनाचा प्रदीर्घ काळाचा अनुभव आहे. त्यांचं मार्गदर्शन सुद्धा सरकारला आहे. तरीही भाजपचे नेते पवार हे अत्यंत कमी उंचीचे नेते असल्याचं सांगत आहेत, त्यावर तुम्हाला काय वाटतं?, असा सवाल संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी चंद्रकांत पाटलांवर त्यांचं नाव न घेता टीका केली. जाऊ द्या हो… असल्या प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांच्याबद्दल मला काही बोलायचीसुद्धा गरज वाटत नाही. त्यांचं कुणी सीरियसली घेत नाही… ऐकू पण नये असली लोकं आहेत ही. मान्य… पण बोलणाऱ्यांची लायकी काय आहे? कोणीही काहीही बोलेल आणि काहीही ऐकायचं? कशाला वेळ घालवतायेत त्यात, असं उद्धव ठाकरे म्हणाले. दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही टीका केली.

सगळे माझ्याशी प्रेमाने, आपुलकीने वागतात

यावेळी त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी उत्तम समन्वय असून सरकार चालवताना कोणतीही कसरत करावी लागत नसल्याचं स्पष्ट केलं. सरकार चालवताना कसरत करतोय असं वाटत नाही. कारण काहीही असेल, पण तीनही पक्ष एकमेकांत असे मिसळून गेले आहेत. अगदी अजितदादा आहेत… बाळासाहेब थोरात आहेत, अशोकराव आहेत… कुणाकुणाची नावं घेऊ? नितीनराव आहेत, जितेंद्र आहे, वडेट्टीवार आहे, हसन मुश्रीफ आहेत, नवाबभाई आहेत… सगळ्यांचीच नावं घ्यावीशी वाटत आहेत, पण किती जणांची नावं घेऊ… सगळे माझ्याशी प्रेमाने, आपुलकीने आणि आदराने वागताहेत… आणि मुख्यमंत्री महोदय म्हणतील ते, अशीच त्यांची भूमिका असते, असं ते म्हणाले.

मला आश्चर्य वाटतं की, काही वेळेला मी कॅबिनेटमध्ये बघत असतो की, मला अनुभव नाही तरी मी बसलोय… आणि ही सगळी लोकं… कालपर्यंत सगळे एकमेकांच्या विरोधात होतो… पण आज ज्या आपुलकीने वागताहेत… आदराने वागताहेत… त्यांचं वर्णन करता येत नाही. फार समजुतीने सगळे जण छान वागताहेत आणि सगळं अतिशय चांगलं चाललं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

हिंदुत्व सोडायला ते काय धोतर आहे?; मुख्यमंत्र्यांचा भाजपसह राज्यपालांवर पलटवार

सरकारला जनतेचे आशीर्वाद! ईडी, सीबीआयची भीती कुणाला दाखवता?; ईडीच्या कारवाईवर मुख्यमंत्र्यांचा रोखठोक सवाल

भगवा उतरवणं सोडून द्या, आधी पालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून बघा; उद्धव ठाकरेंचा भाजपला सल्ला

(Uddhav Thackeray taunt chandrakant patil)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.