भोकर नगरपरिषदेत निवडणुकीच्या हालचाली, अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला

भोकर नगरपरिषदेत निवडणुकीच्या हालचाली, अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला
काँग्रेस नेते अशोक चव्हाण

2015 साली भोकरमध्ये काँग्रेसला 12 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादी 3, भाजप 2 आणि अपक्ष दोन जागी निवडून आले होते. यंदाच्या नगरपंचायत निवडणुकीतही अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

राजीव गिरी

| Edited By: अनिश बेंद्रे

Jun 20, 2021 | 8:36 AM

नांदेड : काँग्रेसचे दिग्गज नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या मतदारसंघातील भोकर नगरपरिषदेत निवडणुकीच्या (Bhokar Nagar Parishad Election) हालचाली सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडी एकत्रित निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची चिन्हं आहेत. चव्हाणांसमोर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं आव्हान असेल. (Ashok Chavan Bhokar Nagar Panchayat Election Nanded to begin soon)

भोकर नगरपरिषदेची स्थिती काय?

2009 मध्ये स्थापन झालेल्या भोकर नगरपरिषदेत 19 सदस्य आहेत. 2009 च्या पहिल्या निवडणुकीत इथे काँग्रेसने 17 जागा जिंकल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा मिळवता आल्या होत्या. त्यानंतर 2015 साली भोकरमध्ये काँग्रेसला 12 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादी 3, भाजप 2 आणि अपक्ष दोन जागी निवडून आले होते.

आता महाविकास आघाडीचा फॉर्म्युला अशोक चव्हाण इथल्या निवडणुकीत राबवू शकतात. तर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, एमआयएम आणि वंचित आघाडी हे काँग्रेससाठी कितपत आव्हान निर्माण करु शकतात याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे.

बारडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का

भोकर मतदारसंघातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बारडमध्ये शिवसेनेची सत्ता आल्यामुळे अशोक चव्हाण यांना काही महिन्यांपूर्वी जोरदार धक्का बसला होता. 17 पैकी 16 जागांवर शिवसेनेने बाजी मारली. नांदेडमध्ये शिवसेनेने काँग्रेसला आणि पर्यायाने पालकमंत्री अशोक चव्हाण यांना शह दिल्याची चर्चा रंगली होती. या ग्रामपंचायतीत शिवसेना विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना होता.

सातत्याने काँग्रेसकडे असलेल्या या ग्रामपंचायतीची निवडणूक म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रंगीत तालीम मानली जाते. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीतही अशोक चव्हाणांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

लोकसभेला पराभवानंतरही अशोक चव्हाण विजयी

लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी तत्कालीन खासदार अशोक चव्हाणांना पराभवाची धूळ चारली होती. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर अशोक चव्हाण भोकर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. विधानसभेतही पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून चव्हाण जिद्दीला पेटले होते. अखेर विधानसभेला अशोक चव्हाणांनी विरोधकांना आस्मान दाखवले.

संबंधित बातम्या :

नांदेडमध्ये शिवसेनेकडून अशोक चव्हाणांना धक्का, 17 पैकी 16 जागांवर भगवा फडकवला

भोकरमध्ये खासदार चिखलीकरांची एकाकी झुंज, भाजप उमेदवाराच्या प्रचाराला नेत्यांची दांडी

(Ashok Chavan Bhokar Nagar Panchayat Election Nanded to begin soon)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें