AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Uddhav Thackeray : काय सांगता? आसामच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंनाही आमंत्रण..! पण कशासाठी वाचा सविस्तर

आता दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार आता कोणी वाचवू शकणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन अटळ आहे. पण नव्याने सत्ता केव्हा स्थापन होणार याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगतानाच सध्याच्या राजकीय परस्थितीचा आनंदही होत असल्याचे आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितले आहे.

CM Uddhav Thackeray : काय सांगता? आसामच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंनाही आमंत्रण..! पण कशासाठी वाचा सविस्तर
आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गुवाहटीला या असे आमंत्रणच दिले आहे.
| Updated on: Jun 24, 2022 | 5:26 PM
Share

मुंबई : (Maharashtra Politics) राज्याच्या राजकारणात उलथा-पालथ होत असताना जर कोणी थेट मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आसामला येण्याचे आमंत्रण देत असेल सर्वांच्याच भुवया उंचावणार आहेत. पण हे झालंय..अहो खरं आसामचे (Assam CM) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी थेट उद्धव ठाकरे यांनाच आसाममध्ये या असे आमंत्रण दिलेले आहे. आता यावरुन आणखीन मोठ्या (Political affairs) राजकीय घडामोडी काय घडणार असा सवाल तुम्हाला पडला असेल पण त्यांनी राजकीय घडामोडीसाठी नाही तर आता सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी असे म्हणत सध्याच्या राजकीय परस्थितीवर एक प्रकारे खिल्ली उडवली आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांनी असे विधान करुन शिवसेनेला डिवचल्याचाच प्रकार केला आहे. मात्र, शिंदे गटाकडे वाढत्या संख्या बळामुळे आता महाविकास आघाडी धोक्यात हे निश्चित झाले आहे. शिवसेना पक्षाची आणि मुख्यमंत्र्यांची झालेली अवस्था पाहून त्यांनी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आसाममध्ये येण्याचे आमंत्रणच त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

सत्ता स्थापनेबद्दल अनभिज्ञ मात्र सध्याच्या परस्थितीचा आनंद

आता दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांना समर्थन देणाऱ्या आमदारांची संख्या ही वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सरकार आता कोणी वाचवू शकणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. त्यामुळे सत्ता परिवर्तन अटळ आहे. पण नव्याने सत्ता केव्हा स्थापन होणार याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे सांगतानाच सध्याच्या राजकीय परस्थितीचा आनंदही होत असल्याचे आसामचे मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीमुळे सध्या उद्धव ठाकरेंकडील आमदारांची संख्या ही घटत आहे तर गुवाहटीमध्ये आमदारांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे.

शिंदे गटाला आमदारांचा वाढता पाठिंबा

दिवसेंदिवस शिंदे गटाकडील आमदारांची सख्या वाढत ही वाढत आहे. गुवाहटी येथील हॉटेलमध्ये बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकावर बैठका पार पडत असून सेत्तेची समीकरणे जुळवली जात आहेत. तर दुसरीकडे शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत पक्षाचे जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला हजेरी लावली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.

भाजपकडून मात्र बोचरी टिका

राज्याच्या राजकारणात उलथा-पालथ होत असताना भाजपाच्या नेत्यांनी मात्र, कमालीचे मौन पाळले आहे. असे असतानाच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र, सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडीशी भाजपाचा काही संबंध नसल्याचे सांगितले आहे. पण या बंडाच्यामागे कोण आहे. याबाबत शरद पवार यांनी भाजपाचे नाव घेतले आहे. यावर पाटलांनी बोचरी टिका केली आहे. पवार आणि शिवसेनेचे संजय राऊत हे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचा अतिरेकी वापर करतात, असे ते म्हणाले. शिवाय मी रोज बातम्याही पाहत नाही त्यामुळे राज्याच्या राजकारणाबद्दल फारशी कल्पना नसल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.