AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Assembly bypoll result : देशात 13 जागांवर पोटनिवडणूक, इंडिया आघाडीचा भाजपाला मोठा झटका

Assembly bypoll result : सात राज्यातील 13 विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक झाली. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने दमदार प्रदर्शन केलय. विधानसभा पोटनिवडणुकीत किती जागांवर कुठल्या पक्षाने विजय मिळवलाय, त्या बद्दल जाणून घ्या.

Assembly bypoll result : देशात 13 जागांवर पोटनिवडणूक, इंडिया आघाडीचा भाजपाला मोठा झटका
Assembly bypoll result 2024
| Updated on: Jul 13, 2024 | 3:22 PM
Share

लोकसभा निवडणुकीनंतर आज विधानसभा पोट निवडणुकांच्या निकालाकडे सगळ्यांच लक्ष होतं. सात राज्यातील 13 विधानसभा क्षेत्रात पोटनिवडणूक झाली. या 13 जागांवर 10 जुलैला मतदान झालं होतं. बिहार, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, मध्य प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये विधानसभेची पोटनिवडणूक झाली. हिमाचल प्रदेशच्या नालागढ सीट वर सर्वाधिक 78.1 टक्के आणि उत्तराखंडच्या बद्रीनाथ सीटवर सर्वात कमी 47.68 टक्के मतदान झालं होतं.

13 विधानसभा क्षेत्रात झालेल्या या पोटनिवडणुकीत काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीने दमदार प्रदर्शन केलय. इंडिया आघाडीने 11 जागांवर विजय मिळवला. भाजपाला हिमाचल प्रदेशमधील हमीरपूर आणि मध्य प्रदेशच्या अमरवाडा जागेवर समाधान मानाव लागलं.

तीन पैकी दोन जागा काँग्रेसला

हिमाचल प्रदेशात तीन पैकी दोन जागा काँग्रेसने तर एक सीट भाजपाच्या खात्यात गेली. काँग्रेसने देहरा आणि नालागढ सीटवर विजय मिळवला. देहरा येथून सीएम सुक्खू यांच्या पत्नी कमलेश ठाकूर जिंकल्या. नालागढ मधून हरदीप सिंह बावाने भाजपाच्या केएल ठाकूर यांना 8990 मतांनी हरवलं. हमीरपूर येथून भाजपाचे आशीष वर्मा जिंकले.

देशभरातील पोटनिवडणुकीचा निकाल

पश्चिम बंगालमध्ये चारही जागा ममता बॅनर्जी यांच्या TMC ने जिंकल्या.

हिमाचल प्रदेशात तीन पैकी दोन जागा काँग्रेसने आणि एक सीट भाजपाने जिंकली.

पंजाबच्या जालंधरमधून आम आदमी पार्टीने बाजी मारली.

उत्तराखंडच्या दोन्ही जागा काँग्रेसने जिंकल्या.

तामिळनाडू विक्रावंडीची सीट डीएमकेने जिंकली.

मध्य प्रदेश अमरवाडाची सीट भाजपाने जिंकली.

बिहार रुपौली सीट अपक्ष उमेदवार शंकर सिंह यांनी जिंकली. बीमा भारती तिसऱ्या नंबरवर राहिले.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.