AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत फडणवीसाचं ठाकरे सरकारला आव्हान, काय म्हणाले फडणवीस?

जोपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. त्यांनी निर्णय झाल्यावर आमची रणनिती समोर येईलच', असा इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलाय.

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत फडणवीसाचं ठाकरे सरकारला आव्हान, काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
| Edited By: sagar joshi | Updated on: Jul 01, 2021 | 10:50 PM
Share

नागपूर : 5 आणि 6 जुलै रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घ्यावी अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं केली आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होईल आणि विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होईल, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केलाय. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. (Devendra Fadnavis challenges Mahavikas Aghadi government from the post of Assembly Speaker)

‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घोषित होऊ द्या. घोषणा झाल्यावर भाजप आपली रणनिती समोर आणेल. पहिल्यांदा राज्य सरकारचा निर्णय समोर येऊ द्या. जोपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. त्यांनी निर्णय झाल्यावर आमची रणनिती समोर येईलच’, असा इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलाय. दरम्यान, नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. विधानसभा अध्यक्षपद इतक्या अधिवेशनानंतरही रिक्त ठेवणे हे असंविधानिक असल्याचं म्हणत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. राज्यपालांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

फडणवीस केंद्रात जाणार?

देवेंद्र फडणवीस हे केंदात जाणार अशी चर्चा आहे. याबाबत विचारलं असता, आमच्या पक्षात आमचे नेते नरेंद्र मोदी जो आदेश देतील तो सर्वांसाठी शिरोधार्ह असतो. पण एक गोष्ट सांगतो की, ज्याला भाजपचं, महाराष्ट्राचं राजकारण कळतं त्याला हे कळून येईल की, मी महाराष्ट्रातून कुठेही जाण्याची ही वेळ नाही. माझ्या शुभचिंतकांना आनंद होतो की, मला दिल्लीत काही मिळेल. पण मी त्यांना सांगू इच्छितो की माझी दिल्लीत जाण्याची शक्यता नाही. काही लोकांना वाटतं की हा दिल्लीला गेला तर बला टळेल पण बला टळणार नाही, हे देखील मी स्पष्टपणे सांगतो, असंही फडणवीस म्हणाले.

संग्राम थोपटेंचं नाव आघाडीवर

अशावेळी काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षपदासाठी काही नावं शर्यतीत आहेत. यामध्ये सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे संग्राम थोपटे. संग्राम थोपटे हे पुण्यातील भोर मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार आहेत. थोपटे आतापर्यंत भोर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने, संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनावर हल्ला केला होता. आमदार संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांनी थेट पुण्यातील काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली होती.

कोण आहेत संग्राम थोपटे?

संग्राम थोपटे हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत

ते पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतात

संग्राम थोपटे तीनवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत

महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल अशी आशा त्यांना होती

मात्र मंत्रिपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी पुणे काँग्रेस कार्यालयात तोडफोड केली होती

संबंधित बातम्या :

‘आता शॉर्टकट उरला नाही, जस्टिस भोसले कमिटीच्या निर्णयाप्रमाणे जावं लागेल’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला सल्ला

BIG News:मराठा आरक्षणाला पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाचा झटका, मोदी सरकारची पुनर्विचार याचिका फेटाळली

Devendra Fadnavis challenges Mahavikas Aghadi government from the post of Assembly Speaker

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद