लोक तडफडून मरत असतानाही मोदींना पाझर का फुटत नाही?, अतुल लोंढेंचा घणाघात

कोरोना संकट दिवसेंदिवस आक्राळविक्राळ रूप धारण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा असंवेदनशीलपणाही तेवढाच वाढत आहे. atul londhe narendra modi government Amphotericin-B

लोक तडफडून मरत असतानाही मोदींना पाझर का फुटत नाही?, अतुल लोंढेंचा घणाघात
Congress flag
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 3:48 PM

मुंबई: नागपूर खंडपीठाने ताशेरे ओढल्यानंतर तरी केंद्राला जाग येऊन अम्फोटेरीसीन-बी औषध मिळेल का?, असा सवालच काँग्रेसच्या अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी उपस्थित केलाय. कोरोना संकट दिवसेंदिवस आक्राळविक्राळ रूप धारण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi ) असंवेदनशीलपणाही तेवढाच वाढत आहे. पहिले रेमडेसिव्हीरचा घोळ घातला, त्यानंतर लसींच्या घोळाने केंद्र सरकारचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला, असंही अतुल लोंढे म्हणालेत. (Atul Londhe Criticism On Narendra Modi Government Amphotericin B)

नागपूर खंडपीठाचे अम्फोटेरीसीन-बी औषधाच्या तुडवड्यावरून केंद्राला खडे बोल

देशातील अनेक उच्च न्यायालये तसेच सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले. नागपूर खंडपीठानेही अम्फोटेरीसीन-बी औषधाच्या तुडवड्यावरून केंद्र सरकारला खडे बोल सुनावले. म्युकरमायकोसिसच्या आजाराने नागपूरमध्ये लोक मृत्युमुखी पडत आहेत, राज्यावर जबाबदारी ढकलू नका, औषध उपलब्ध का करून द्या, असे सुनावले. औषधांअभावी लोक तडफडून मरत आहेत तरीही मोदींना पाझर फुटत नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटले.

कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिस रोगाने लोक त्रस्त

मोदी सरकारच्या कारभाराचा समाचार घेताना लोंढे म्हणाले की, कोरोनाबरोबरच म्युकरमायकोसिस रोगाने लोक त्रस्त आहेत. रुग्णांची संख्या वाढत आहे, परंतु या आजारावर उपयोगी असलेल्या अम्फोटेरीसीन-बी औषधांचा पुरेसा पुरवठा होत नाही. यावरून नागपूर खंडपीठाने मोदी सरकारला सुनावले, पण मोदी सरकारवर त्याचा काही परिणाम होताना दिसत नाही. मोदी सरकारकडे कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतेही धोरण नाही. कोर्टात फक्त तोंडी माहिती देता, यावरून हे कोर्टाचे काम नाही, असे कोर्टालाच सांगता हे अत्यंत बेजबाबदार आणि बेफिकीरपणाचे लक्षण आहे, असंही अतुल लोंढे म्हणाले.

नागपूर शहर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय

नागपूर शहर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे, नागपूर महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, किमान त्याचे भान ठेवून तरी नागपूरच्या जनतेला कोरोना संकटकाळात योग्य त्या सुविधा पुरवण्याकडे लक्ष देतील, अशी नागपूरकरांची अपेक्षा होती. पण परिस्थिती अत्यंत वाईट आहे. मोदी नागपूरवर कोणता सूड उगवत आहेत, असा सवाल जनता विचारू लागली आहे. औषधे पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, या जबाबदारीतून पळ काढू नका. अम्फोटेरीसीन-बी औषध नागपूरला उपलब्ध करून द्या, अशी मागणी लोंढे यांनी केली.

संबंधित बातम्या

गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती- फडणवीस

शिक्षकांसाठी मोठी बातमी, टीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहणार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा निर्णय

Atul Londhe Criticism On Narendra Modi Government Amphotericin B

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.