AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबादची विकासकामं रखडली, मुख्यमंत्र्यांना शहर फक्त राजकारणासाठी हवंय? माजी महापौर नंदकुमार घोडेलेंचा संतप्त सवाल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप करताना नंदकुमार घोडेले म्हणाले, ' स्मार्ट सिटीतून 4 मल्टी स्पेशालिटी सिडको, हाडको, सातारा आणि आंबेडकर नगरमध्ये करणार होतो. पण राज्य सरकारकडे महापालिकेने डॉक्टर, कर्मचारी, साहित्य मागितलं होतं.

Aurangabad | औरंगाबादची विकासकामं रखडली, मुख्यमंत्र्यांना शहर फक्त राजकारणासाठी हवंय? माजी महापौर नंदकुमार घोडेलेंचा संतप्त सवाल
नंदकुमार घोडेले, माजी महापौरImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Aug 18, 2022 | 6:00 PM
Share

औरंगाबादः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना औरंगाबाद शहर फक्त राजकारणासाठी हवं होतं. शहराच्या विकासकामांकडे त्यांचं लक्ष नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारने सुरु केलेल्या अनेक योजनांमध्ये शिंदे सरकारने खोडा घातला. शहरात प्रस्तावित रस्ते विकास कामांत कपात करण्यात आली. शहरातील चार मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलची योजना रद्द केली. असे धोरण ठेवल्यास शहराचा विकास कसा होणार, असा सवाल माजी महापौर आणि शिवसेना नेते नंदकुमार घोडेले (Nandkumar Ghodele) यांनी केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारवर घोडेले यांनी आज जोरदार टीका केली. खड्डेमय शहर अशी ओळख पुसून टाकायची असेल तर विकासकामांकडे आवर्जून लक्ष द्या, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा नंदकुमार घोडेले यांनी दिलाय.

माजी महापौरांचा आरोप काय?

टीव्ही9 च्या प्रतिनिधींशी बोलताना माजी महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, ‘ नवीन सरकार स्थापन झालंय, त्यांना शहराशी घेणं देणं नाही. पाच-पाच आमदार जिल्ह्यातून फुटलेत. ऐतिहासिक शहर आहे. पर्यटनाचं शहर आहे. उद्धव ठाकरे, सुभाष देसाई यांनी या शहरात 111 रस्ते 317 कोटी रुपयांचे प्रस्तावित केले होते. ठेकेदारही नियुक्त झाले होते. मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी निर्णय घेतला. त्यातले फक्त 24 रस्ते म्हणजेच 80 कोटी रुपयांचे निर्णय घेतलाय. उद्धव ठाकरेंची सूचना थांबवण्यात आली. हा शहरातल्या नागरिकांची अवहेलना आहे. खड्ड्यांचे शहर म्हणून बदनाम आहे. शहर चकचकीत रस्त्याचं करायचं होतं. पण जिल्हाधिकाऱ्यांनी हा दुर्वैवी निर्णय घेतला. सरकारचं या शहराकडे अजिबात लक्ष नाही. पालकमंत्री असते तर त्यांना मी विनंती केली असती.. पण शहराला पालकमंत्रीदेखील नाहीत… असं वक्तव्य नंदकुमार घोडेले यांनी केलंय.

‘मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलही रद्द केले’

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप करताना नंदकुमार घोडेले म्हणाले, ‘ स्मार्ट सिटीतून 4 मल्टी स्पेशालिटी सिडको, हाडको, सातारा आणि आंबेडकर नगरमध्ये करणार होतो. पण राज्य सरकारकडे महापालिकेने डॉक्टर, कर्मचारी, साहित्य मागितलं होतं. पण आताचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत आहेत. मराठवाड्याच्या राजधानीत असे हॉस्पिटल होणं हे आरोग्य यंत्रणेसाठी बळकटी करणाचं काम होतं. पण शासनाच्या धोरणामुळे प्रशासक तथा आयुक्तांनी ही कामं थांबवली. चार चांगली हॉस्पिटल आता औरंगाबादमध्ये होणार नाहीत. पाणी योजना पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून निधी मिळवण्याच्या हालचाली सुरु होत्या. मात्र हा निधीदेखील मिळालेला नाही. कुणाचाच कुणाला ताळमेळ नाही. आपण कुठं नेऊन ठेवणार आहोत शहराला?

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.