AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संत एकनाथ मंदिराच्या खासगीवरून मनसे आक्रमक, नाट्यगृह चालवू शकत नसाल आयुक्तांनी तर खुर्ची खाली करण्याची मागणी

महापालिका जर रंगमंदिर चालवू शकत नाही तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी. अशा मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो असून खासगीकरणाला आमचा विरोधच राहणार असल्याचंही यावेळी खांबेकर म्हणाले.

संत एकनाथ मंदिराच्या खासगीवरून मनसे आक्रमक, नाट्यगृह चालवू शकत नसाल आयुक्तांनी तर खुर्ची खाली करण्याची मागणी
औरंगाबादेत मंनसेची निदर्शने
| Edited By: | Updated on: Jan 24, 2022 | 4:21 PM
Share

औरंगाबादः शहरातील संत एकनाथ रंगमंदिराच्या (Sant Eknath Rangmandir) खासगीकरणाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकनाथ रंगमंदिर नाट्यगृहासमोर आज सोमवारी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महानगरपालिकेने या नाट्यगृहाच्या खासगीकरणाचा प्रस्ताव ठेवला असून सुरुवातीपासूनच मनसेने (Aurangabad MNS) याला विरोध केला आहे. मात्र महापालिकाही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे मनसेच्या वतीने पुन्हा एकदा निदर्शनं करण्यात आली.

काय आहे मनसेची भूमिका?

शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संत एकनाथ रंगमंदिराच्या खासगीकरणाला विरोध दर्शवला आहे. गेल्या काही वर्षांपासून नूतनीकरण करण्याच्या प्रक्रियेसाठी हे नाट्यगृह बंद आहे. मागील वर्षात याचे नूतनीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असून यासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च करण्यात आले. एवढा खर्च झाल्यानंतर आता मनसेने हे नाट्यगृह खासगी कंत्राटदाराला चालवण्यासाठी देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यावर मनसेने आक्षेप घेतला आहे. खासगीकरण करायचंच होतं तर जनतेचा 10 कोटी रुपयांचा निधी त्यासाठी का वापरला, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केला आहे.

मनसे शहराध्यक्ष सुमित खांबेकर काय म्हणाले?

आंदोलनानंतर भूमिका मांडताना मनसेचे शहराध्यक्ष सुमित खांबेकर म्हणाले, संत एकनाथ रंगमंदिराचं खासगीरकरण करण्याचा निर्णय आठ दिवसांपूर्वी झाला होता. आम्ही यास विरोध दर्शवला होता. तरीही महापालिका त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. 10 कोटी खऱ्च करूनही खासगीकरण फक्त कंत्राटदारांच्या चिरीमिरी करण्यासाठी घेण्यात आला असल्याचा आरोप सुमित खांबेकर यांनी केलाय. पुढे बोलताना ते म्हणाले, ‘एकवनाथ रंगमंदिराचं खासगीकरण करण्याचा निर्णय फक्त शिवसेनेच्या दबावाखाली घेण्यात आला आहे. महापालिका अत्यंत उत्तम रितीने हे नाट्यगृह कसे चालवू शकते, याचे नियोजनही आम्ही सूचवले आहे. तरीही महापालिका जर रंगमंदिर चालवू शकत नाही तर आयुक्तांनी खुर्ची खाली करावी. अशा मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्याविरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो असून खासगीकरणाला आमचा विरोधच राहणार असल्याचंही यावेळी खांबेकर म्हणाले.

इतर बातम्या-

फडणवीस म्हणाले, तुम्ही आमच्या चिन्हावर लढला होतात, राऊतांनी भुजबळांसह सेनेच्या वाघांची यादी वाचली

मारुती सुझुकीची इलेक्ट्रिक कार Tata Punch EV ला टक्कर देणार, जाणून घ्या कारमध्ये काय असेल खास?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.