AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ambadas Danve | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पदी अंबादास दानवे, औरंगाबादमधील वैजापुरात जंगी स्वागत

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सोमवारी अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याची माहिती दिली. शिवसेनेने पूर्वीच त्यांच्या नावाची शिफारस केली होती.

Ambadas Danve | विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते पदी अंबादास दानवे, औरंगाबादमधील वैजापुरात जंगी स्वागत
| Edited By: | Updated on: Aug 10, 2022 | 4:15 PM
Share

औरंगाबादः शिवसेना आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्यानंतर त्यांचा औरंगाबाद शहरात (Aurangabad city) जंगी स्वागत करण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, गंगापूर, बजाज नगर, बाबा पेट्रोल पंप आणि क्रांती चौकातही त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. या सगळ्या कार्यकर्त्यांनी फुलांची उधळण करत अंबादास दानवे यांच्या स्वागतासाठी मोठा जल्लोष केला. वैजापूरातील (Vaijapur) शिवसैनिकांना संबोधित करताना त्यांनी औरंगाबादमधील बंडखोर आमदारांना धडा शिकवणार असल्याचं बोलून दाखवलं. पुढील निवडणुकांमध्ये निष्ठावान शिवसैनिकच विजयी होतील, अशा रितीने पक्ष संघटन वाढवणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

भाजपवर कडाडून टीका

विरोधी पक्ष नेते पदी विराजमान झाल्यानंतर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांचं औरंगाबादेत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांसह भाजपवर तीव्र शब्दात टीका केली. आम्ही दोन महिन्यांपासून म्हणतायत आम्ही क्रांती केली, उठाव केला… पण यांनी असं काहीही नाही तर गद्दारी केली आहे, असं वक्तव्य दानवे यांनी केलं. तसेच बिहारमध्ये नितीश कुमारांबाबतही भाजपचा हाच डाव होता, मात्र तो उलथवून टाकण्यात आल्याचं दानवे म्हणाले. भाजपच्या वृत्तीवर टीका करताना ते म्हणाले, भाजपच्या आमिषाला बळी पडून शिवसेना आमदारांनी ही गद्दारी केली आहे. पण आतापर्यंत भाजपने ज्याला ज्याला जवळ केलं, त्यालाच संपवल्याचा इतिहास आहे. गोव्यात मगोपा आहे. कर्नाटकाचा, बसपाचा इतिहास आहे. त्यामुळे भाजप आज जरी या लोकांना हार तुरे घालत असले तरी…. आमच्याकडे अजाबळी देतात, तसा बळी देण्यापूर्वी त्याची फार पूजा केली जाते. या सगळ्या 40-50 लोकांचा बळी भाजप देईल. या गद्दार आणि भाजपच्या विरोधात आमची लढाई असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.

विरोधी पक्षनेते पद दानवेंकडे…

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सोमवारी अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याची माहिती दिली. शिवसेनेने पूर्वीच त्यांच्या नावाची शिफारस केली होती. यासाठी काँग्रेसदेखील इच्छुक असल्याचे बोलले जात होते. मात्र संख्याबळाचा विचार करता हे पद शिवसेनेकडे देण्यात आले. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण 78 सदस्या आहेत. त्यापैकी भाजपचे 24, शिवसेनेचे 12 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 10 सदस्या आहेत. तर इतर पक्षांचे सात सदस्य आहेत. विधान परिषदे्या 15 जागा रिक्त आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेनेने केलेला दावा मान्य करण्यात आला.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.