AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जालन्यात 6 महिन्यांपासून विकास ठप्प, दुर्बिणीतूनही विकास पाहायला मिळेना : बबनराव लोणीकर

भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निधी तक्रारीला पाठिंबा दिला आहे (Babanrao Lonikar on Jalna Fund distribution).

जालन्यात 6 महिन्यांपासून विकास ठप्प, दुर्बिणीतूनही विकास पाहायला मिळेना : बबनराव लोणीकर
| Updated on: Aug 25, 2020 | 9:00 PM
Share

जालना : भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांच्या निधी तक्रारीला पाठिंबा दिला आहे (Babanrao Lonikar on Jalna Fund distribution). माझ्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची तिच तक्रार असल्याचं म्हटलंय. तसेच येणाऱ्या काळात काँग्रेसने सुरु केलेलं आंदोलन सर्व पक्षांचं होऊ शकतं, असा इशारा देखील सरकारला दिला आहे. यावेळी त्यांनी पालकमंत्री राजेश टोपे यांना आपलं वजन वापरुन निधी आणण्याची मागणी केली.

बबनराव लोणीकर म्हणाले, “काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांची तक्रार खरी आहे. हीच तक्रार माझीही आहे. हीच तक्रार जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींचीही आहे. आघाडीचं सरकार आलं आणि त्यांनी जालना जिल्ह्यासाठी निधी दिला नाही.पालकमंत्र्यांनी देखील दिला नाही. त्यामुळेच आघाडीत आमदार गोरंट्याल यांनी ही तक्रार केली असावी. जालना शहरातील विकास असेल, रस्ते, पिण्याचं पाणी, परतूर शहरातील रस्ते अशी सर्व कामं ठप्प आहेत.”

“मी 5 वर्षात जालना नगरपालिकेसाठी 200 कोटीचा निधी आणला”

“नगरपालिका काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा शिवसेना अशी कोणाच्याही ताब्यात असो मी मंत्री असताना जालना शहरात 200 कोटी रुपयांचा निधी दिला. 145 कोटी रुपये पाणी पुरवठ्याला दिले. याचा उपयोग पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईनसाठी झाला. शहरातील रस्त्यासाठी पैसा दिला. मी 5 वर्षात 200 कोटीपेक्षा जास्त निधी जालना नगरपालिकेला दिला,” असं लोणीकर म्हणाले.

“भोकरदन, परतूर, मंठा, जालना यासह जिल्ह्यातील सर्वच नगरपालिकेला 20 हजार कोटी रुपये दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आणि राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भरपूर निधी दिला. नितीन गडकरी यांनी भरीव निधी दिला. जिल्ह्यामध्ये विकासाची कामे सुरु होती,” असंही त्यांनी नमूद केलं.

“जालन्यात काँग्रेसकडून आंदोलनाची सुरुवात, आता सर्वपक्षीय आंदोलन होईल”

बबनराव लोणीकर म्हणाले, “6 महिने झाले विकास ठप्प झाला आहे. आघाडी सरकाने जालन्याच्या विकासासाठी दमडीही दिलेली नाही. जिल्हा ठप्प झालाय, दुर्बिणीतूनही विकास पाहायला मिळत नाही. जालन्यात आंदोलनाची सुरुवात कॉंग्रेसकडून झालीय. मात्र हे आंदोलन सर्वपक्षीय होऊ शकतं.” त्यामुळे स्वतः पालकमंत्री राजेश टोपे यांनी यात लक्ष घालावं. त्यांनी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी आपलं वजन वापरावं, अशी मागणी बबनराव लोणीकर यांनी केली.

संबंधित बातम्या :

काही पक्षातील आमदारांना जास्त निधी, काहींना कमी, पण त्या पक्षाचं नाव घेणार नाही : थोरात

“कातिल हमारे कत्ल से मशहूर हो गया, हमें शहीद होकर भी…” कैलास गोरंट्याल यांची शेरोशायरी

अनैसर्गिक युतीची सत्ता जास्त टिकत नाही, अधिवेशनापूर्वी फडणवीसांचा हल्लाबोल

संबंधित व्हिडीओ :

Babanrao Lonikar on Jalna Fund distribution

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.