“कातिल हमारे कत्ल से मशहूर हो गया, हमें शहीद होकर भी…” कैलास गोरंट्याल यांची शेरोशायरी

"जितना चाहा उतनी मोहब्बत नहीं मिली | मुनाफे का छोड़ीए, लागत भी नहीं मिली, कातिल हमारे कत्ल से मशहूर हो गया, हमें शहीद होकर भी शौहरत ना मिली" अशी शायरी काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी ऐकवली.

कातिल हमारे कत्ल से मशहूर हो गया, हमें शहीद होकर भी... कैलास गोरंट्याल यांची शेरोशायरी
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 4:22 PM

मुंबई : काही आमदारांना निधी दिला नाही, मात्र त्यातून आता मार्ग काढल्याने माझी नाराजी दूर झाली आहे, अशी प्रतिक्रिया नाराज झालेले काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिली आहे. “कातिल हमारे कत्ल से मशहूर हो गया, हमें शहीद होकर भी शौहरत ना मिली” अशी शेरो-शायरीही त्यांनी केली. सकाळी मंत्रालयात त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. (Disappointed Congress Jalna MLA Kailash Gorantyal meets Deputy CM Ajit Pawar)

“काही आमदारांना निधी दिला नाही, हे खरे आहे. त्यातून आता मार्ग काढला आहे. त्यामुळे माझी नाराजी दूर झाली. नगरपालिकांच्या विकासकामांचा निधी पीडब्लूडीला (सार्वजनिक बांधकाम विभाग) देण्यात आला होता. उपमुख्यमंत्री अजितदादांनी शब्द दिला, त्यानंतर माझी नाराजी दूर झाली” अशी प्रतिक्रिया कैलास गोरंट्याल यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली.

माझी नाराजी शंभर टक्के दूर झाली. कालच अजितदादा आणि बाळासाहेब थोरात यांचा फोन आला. येणाऱ्या निधीत मला वाटा देण्याचं आश्नासन दादांनी दिलं. माझ्यासोबतच्या आमदारांची यादी मागितली. मी त्यांना ती यादी देईन, असे गोरंट्याल यांनी सांगितले.

“जितना चाहा उतनी मोहब्बत नहीं मिली | मुनाफे का छोड़ीए, लागत भी नहीं मिली, कातिल हमारे कत्ल से मशहूर हो गया, हमें शहीद होकर भी शौहरत ना मिली” अशी शायरीही त्यांनी ऐकवली.

जालन्यात विकास निधीच्या वाटपावरुन काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल नाराज झाले होते. आधीच महाविकास आघाडीत धुसफूस असल्याच्या चर्चा रंगल्या असताना गोरंट्याल यांनीही उपोषणाचा इशारा दिला. त्यामुळे अजित पवार यांनी गोरंट्याल यांची समजूत काढली.

(Disappointed Congress Jalna MLA Kailash Gorantyal meets Deputy CM Ajit Pawar)

“अजित पवारांचा काल दुपारी 3.40 वाजता फोन आला होता. तुमची नाराजी मी दूर करणार असल्याचे ते म्हणाले. निधी 31 मार्चच्या आधीचे होते. येणारा नवीन फंड आम्ही तुमच्या नगरपालिकेला देणार आहोत” असे अजित पवार यांनी सांगितल्याची माहिती काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना दिली.

“दादा, तुमच्यावर आमचा भरोसा आहे, असे मी म्हणालो. उपोषणही मी मागे घेतले. बाकीच्या आमदारांचीही नाराजी नाही. अजितदादांनी स्वतः गॅरंटी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आज भेट नाही, मात्र अधिवेशनात मुख्यमंत्री भेटतील” असेही गोरंट्याल म्हणाले.

संबंधित बातम्या :

काँग्रेसच्या नाराज आमदाराची अजित पवारांकडून समजूत, गोरंट्याल म्हणतात “दादा, तुमच्यावर पूर्ण भरोसा”

(Disappointed Congress Jalna MLA Kailash Gorantyal meets Deputy CM Ajit Pawar)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.