नाही तर त्यांना कायमचा हिजडा म्हणेल, बच्चू कडू असं काय म्हणाले?; कुणाला म्हणाले?

आता आरपारची लढाई लढायला मी तयार आहे. जिथे म्हणाल तिथे एकटा यायला तयार आहे, असं खुल आव्हानही त्यांनी रवी राणा यांना दिलं आहे. रवी राणा यांनी केलेल्या तोडपाणीच्या आरोपावर येत्या 1 तारखेपर्यंत पुरावे द्यावेत.

नाही तर त्यांना कायमचा हिजडा म्हणेल, बच्चू कडू असं काय म्हणाले?; कुणाला म्हणाले?
नाही तर त्यांना कायमचा हिजडा म्हणेल, बच्चू कडू असं काय म्हणाले?; कुणाला म्हणाले?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 9:37 AM

अमरावती: शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू (bacchu kadu) आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा (ravi rana) यांच्याताली वाद शिगेला पोहोचला आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन करोडो रुपये छापल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला होता. जिथे आंदोलन केलं तिथे बच्चू कडू यांनी तोडपाणी केल्याचा आरोपही रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केला होता. त्यामुळे बच्चू कडू संतापले असून त्यांनी राजपेठ पोलीस ठाण्यात (police station) रवी राणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. माझ्यावरील आरोप राणा यांनी सिद्ध केले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेल. नाही तर त्यांना कायमचा हिजडा म्हणेल, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. त्यामुळे राणा विरुद्ध कडू हा वाद अधिकच शिगेला पोहोचण्याची चिन्हे दिसत आहेत.

आमदार रवी राणा यांच्याविरोधात तक्रार केल्यानंतर बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधला. रवी राणा यांनी आरोप केले तर पुरावे द्यावेत. हा लहान विषय नाही आहे. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून सांगता आणि दुसरीकडे स्वतः मंत्रिपदाच्या रांगेत उभी राहता, असा टोला बच्चू कडू यानी राणा यांना लगावला.

हे सुद्धा वाचा

आता आरपारची लढाई लढायला मी तयार आहे. जिथे म्हणाल तिथे एकटा यायला तयार आहे, असं खुल आव्हानही त्यांनी रवी राणा यांना दिलं आहे. रवी राणा यांनी केलेल्या तोडपाणीच्या आरोपावर येत्या 1 तारखेपर्यंत पुरावे द्यावेत. त्यांनी पुरावे दिले तर मी त्यांच्या घरी भांडी घासेल. नाही दिले तर त्यांना कायमचा हिजडा म्हणेल, असंही ते म्हणाले.

रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. राजकीय करियर उभं करायला आम्हाला 20-20 वर्ष लागले आहेत. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी दिले असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहोत. तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारणार आहोत, असंही ते म्हणाले.

दरम्यान, बच्चू कडू यांनी रवी राणा यांच्या किराणा वाटपावर टीका केली होती. त्यामुळे रवी राणा यांनी गुवाहाटीचं प्रकरण उकरून बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे बच्चू कडू संतापले असून त्यांनी थेट रवी राणा यांना आव्हानच दिलं आहे.

Non Stop LIVE Update
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.