Rajya Sabha elections : बहुजन विकास आघाडाची तीन मतं भाजपला, क्षितिज ठाकूर हितेंद्र ठाकूर राजेश पाटील करणार मतदान

क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील हे भाजपाला मत देणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपने आता मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

Rajya Sabha elections : बहुजन विकास आघाडाची तीन मतं भाजपला, क्षितिज ठाकूर हितेंद्र ठाकूर राजेश पाटील करणार मतदान
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 04, 2022 | 10:29 AM

पालघर – बहुजन विकास आघाडी (BVA) राज्यसभा निवडणुकीत भाजपाला (BJP) मतदान करणार आहे. सुत्रांकडून ही प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे बहुजन आघाडीची तीन मतं भाजपाला मिळणार आहेत. क्षितिज ठाकूर (kshitij thakur), हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील हे भाजपाला मत देणार आहेत. राज्यसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर भाजपने आता मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे.  मागील अनेक दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे. विशेष म्हणजे निवडणुका जाहीर झाल्यापासून दोन्ही पक्षांमधला संघर्ष अधिक वाढला आहे.

क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील हे भाजपाला मत करणार

क्षितिज ठाकूर, हितेंद्र ठाकूर, राजेश पाटील हे भाजपाला मत करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. या तीन मतांमुळे भाजपाचं पारडं अधिक मजबूत होईल. निवडणुका जाहीर झाल्यापासून दोन्ही पक्षाने चांगलीचं कंबर कसली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यानंतर वसई, विरार आणि पालघर क्षेत्रामध्ये अधिक लक्ष घातलं होतं. तेव्हापासून बहुजन विकास आघाडीची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत होती.

अपक्ष उमेदवारांना चांगले दिवस

राज्यसभेची निवडणूक होणार बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये मतांसाठी चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे राज्य सभेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेकडे सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेशी मतं नाही आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचा महत्त्वाच्या मतांवर डोळा आहे. दोन्ही पक्षांना अपक्ष उमेदवारांनी मतदान केल्यास सहावा उमेदवार निवडून येऊ शकतो अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना चांगले दिवस झाले आहेत. येत्या दहा जूनला मतदान होणार आहे.

29 आमदार कुणाल राज्यसभेवर पाठवणार याकडे सगळ्यांचे लक्ष

अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे महाविकास आघाडीचे दोन आमदार सध्या तुरूंगात आहेत. दोन आमदारांची मते महत्त्वाची आहेत. तसेच या दोन मतांसाठी महाविकास आघाडी कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याची माहिती मिळाली आहे. 29 आमदार कुणाल राज्यसभेवर पाठवणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. विधानसभेत सध्या छोट्या पक्षांचे एकूण 16 आमदार आहेत. त्याचबरोबर 13 अपक्ष आमदार देखील आहेत. भाजप आणि शिवसेनेचं अधिक लक्ष अपक्ष आमदारांकडे आहे.

हे सुद्धा वाचा

 

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें