बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, थोरातांचा हल्लाबोल

"नितीन राऊत यांच्याबद्दल बावनकुळे यांनी बोलण्याचा काय संबंध? बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत"

बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत, थोरातांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 11:49 AM

नाशिक : महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावर हल्लाबोल केला. “ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याबद्दल बावनकुळे यांनी बोलण्याचा काय संबंध? बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले. ते नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सध्या वीजबिलांवरुन (Electricity Bill) मोठं राजकारण रंगलं आहे. भाजपसह विरोधकांनी आकडेवारी सादर करुन, सत्ताधारी ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. बावनकुळेंच्या आकडेवारीचा आधार घेऊन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली होती. त्याला थोरात यांनी उत्तर दिलं.  (Balasaheb Thorat attacks on Chandrashekhar Bawankule)

बाळासाहेब थोरात म्हणाले, “लॉकडाऊनकाळात आलेल्या वीजबिल तक्रारी उर्जामंत्र्यांनी सोडविल्या आहे. नितीन राऊत यांच्याबद्दल बावनकुळे यांनी बोलण्याचा काय संबंध? बावनकुळे काड्या लावण्याचा प्रयत्न करत आहेत”

भाजपकडून आज समतेचे, राज्य घटनेचे मूलतत्त्व छेद देण्याचं काम सुरु आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस सूडबुद्धीने आहे का ? याबद्दल माहिती नाही, असं थोरात यांनी नमूद केलं.

काँग्रेसच्या खात्यांवर अन्याय

दरम्यान, यावेळी थोरात यांनी पुन्हा एकदा काँग्रेसची खदखद व्यक्त केली. काँग्रेसच्या खात्यांवर अन्याय होतोय ही आमची भावना आहे. मुख्यमंत्र्यांकडे आम्ही तक्रार केली आहे, असं थोरात म्हणाले.

सरकार आर्थिक अडचणीत आहे. दर महिन्याला 12 हजार कोटींचं कर्ज काढावं लागतंय, असंही त्यांनी सांगितलं.

मुंबई मनपा निवडणूक एकत्र लढणार?

दरम्यान, मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवू शकतात, लवकरच एकत्र बैठक घेऊ. त्यामुळे साहजिकच आमच्या जागा वाढणार, असा दावा थोरातांनी केला.

बावनकुळेंचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

परिवनह विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एका मिनिटात एक हजार कोटी रुपये दिले जातात. मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही?; असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

वीज बिलाच्या मुद्द्यावर हे सरकार खोटं बोलत आहे. सरकारने 100 युनिट वीज माफीचं आश्वासन दिलं होतं. दिलेलं आश्वासन या सरकारने पाळलं नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प होते. तरीही सरासरी बिल दिलं. ऊर्जामंत्री नितीन राऊतही हतबल आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या फायली फेकून देत आहेत, असा घणाघात चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.

(Balasaheb Thorat attacks on Chandrashekhar Bawankule)

संबंधित बातम्या 

परिवहन विभागाला एका मिनिटात एक हजार कोटी दिले; मग वीजबिल माफी का नाही?; बावनकुळेंचा सवाल   

श्रेयवादाच्या लढाईत वीज बिलमाफी अडकली?, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्र्यांची फाईल फेटाळत असल्याचा बावनकुळेंचा आरोप 

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.