थोरात-पवार भेटीत काय ठरलं? मोदी सरकारला शह देण्याचा प्लॅन तयार होतोय?

शरद पवारांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी बँकिंग कायद्यामधील (modi government bank policies) सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केलीय. Balasaheb Thorat sharad Pawar Modi govt

थोरात-पवार भेटीत काय ठरलं? मोदी सरकारला शह देण्याचा प्लॅन तयार होतोय?
Balasaheb Thorat sharad Pawar
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 5:21 PM

मुंबई : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतल्यानं राजकीय तर्कवितर्कांना उधान आलंय. शरद पवारांच्या भेटीनंतर बाळासाहेब थोरात यांनी बँकिंग कायद्यामधील (modi government bank policies) सुधारणांचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करणार असल्याची घोषणा केलीय. बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते. (Balasaheb Thorat met sharad Pawar to Modi govt issue and will set up a committee)

महाविकास आघाडी कायदेशीर मार्गाने संघर्ष करेल

बँकिंग कायद्यांमधील सुधारणांसाठी एक समिती स्थापन करत असून, भविष्यात केंद्र सरकारच्या विरोधात महाविकास आघाडी कायदेशीर मार्गाने संघर्ष करेल, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलंय. मोदी सरकार सहकारी बँकांच्या संदर्भात नवीन नियमावली आणत सहकारी बँकांवर निर्बंध आणणार आहे. विशेष म्हणजे सहकारी बँकांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांचे प्रामुख्याने प्रभुत्व आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आतापासूनच कंबर कसली आहे.

नेमकी कशी असेल समिती?

सहकारी बँका (Cooperative Bank) जगवण्यासाठी त्यांना ताकद देण्यासाठी ही समिती काम करणार आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील समितीचे अध्यक्ष असणार आहे. या समितीमध्ये महाविकास आघाडी पक्षातील तिन्ही नेते असणार आहे. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख आणि सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांचा देखील सहभाग असणार आहे.

या समितीची पहिली बैठक उद्या होणार

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि अन्न आणि औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणेंचा समावेश असेल. शिवसेनेकडून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख उपसमितीत असणार आहेत. या समितीची पहिली बैठक उद्या होणार आहे. केंद्र सरकारने सहकारी बँकांच्या संदर्भामध्ये नियमावली लागू केल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धाबे दणाणलेत.

या समितीत सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ असणार

या समितीत सहकार क्षेत्रातील तज्ज्ञ असणार आहेत. अरविंद कुमार अप्पर मुख्य सचिव, सहकार विद्याधर अनासकर प्रशासक महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, विश्वास ठाकूर चेअरमन विश्वास नागरी सहकारी बँक, अनिल कवडे सहकार आयुक्त हे या समितीत असतील. राष्ट्रवादी आणि काँग्रेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि काही भागांमध्ये मराठवाड्याचा सहकार क्षेत्राच्या माध्यमातून कायम वर्चस्व करत सत्ता स्थापन करत आलेत.

संबंधित बातम्या:

आमच्या कार्यक्रमात तुम्ही काय करताय?; भाई जगताप पोलिसांवर भडकले

अजूनही नेहरुंच्याच पुण्याईवर देश चाललाय; संजय राऊतांचा भाजपला टोला

Balasaheb Thorat met sharad Pawar to Modi govt issue and will set up a committee

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.