AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Baramati Election 2024 : बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप, VIDEO

Baramati Election 2024 : बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी एक गंभीर आरोप केला आहे. बारामतीमध्ये प्रतिष्ठेची लढाई आहे. शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार असा सामना आहे.

Baramati Election 2024 : बारामतीत मतदान सुरु असतानाच युगेंद्र पवारांच्या आईचा मोठा आरोप, VIDEO
Sharmila Pawar-Yugendra Pawar
| Updated on: Nov 20, 2024 | 1:22 PM
Share

बारामतीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राडा झाला आहे. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा सामना आहे. युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी मतदारांना दमदाटी केली जात असल्याचा आरोप केला आहे. “माझ्यासमोर दमदाटी केली. माझ्यासमोर ती व्यक्ती होती. मतदान केंद्राच्या आत स्वत:च्या घरातलं लग्न कार्य असल्यासारखं, या, बसा मतदान केलं का? अशी विचारणा सुरु होती. खाण खुणा केल्या जात होत्या” असा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे.

“संकेत काय देत होते, माहित नाही. आम्ही आक्षेप घेतला. तुमही असं करु नका, चुकीच आहे, असं सांगितलं. आमचा मोहसीन त्यांना तेच सांगत होता. त्याला धमकी दिली. मग, पोलिसांनी त्यांना बाहेर काढलं. पोलीस सहकार्य करतायत. मी बाहेर आले, मी आत जात नाहीय. मी गेटच्या बाहेर आले. मोहसीनला आतमध्ये, बघून घेईन अशी धमकी देण्यात आली” असा आरोप शर्मिला पवार यांनी केला आहे.

‘डोळ्यासमोर दिसतय ते मी सांगितलं’

ते अजित पवारांचे कार्यकर्ते होते का? “माहित नाही, ते कोणाचे कार्यकर्ते होते, पण घडयाळाचे आहेत, एवढं सांगू शकते. निवडणूक आयोगाला लेखी तक्रार दिली आहे. सीसीटीव्ही फुटेज डिलीट करतील त्याची भिती वाटते” असं शर्मिला पवार म्हणाल्या. बोगस मतदान होतय असं तुमचं म्हणणं आहे का? “या प्रश्नावर मला त्यावर भाष्य करायच नाहीय. डोळ्यासमोर दिसतय ते मी सांगितलं” असं उत्तर दिलं. ‘इथे येण्याचा इरादा नव्हता’

“मी आज सकाळपासून निघाली आहे, काटेवाडी, कान्हेरीत गेली. मी दुसऱ्या ठिकाणी चालले होते, इथे येण्याचा इरादा नव्हता. पण मोहसीनने आग्रह केला, तो रडू लागला. त्याची आई इथे आली, ती सुद्धा रडत होती. मी त्यांना म्हटलं तुम्ही काळजी करु नका” असं शर्मिला पवार म्हणाल्या.

आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?
आदित्य-अमित ठाकरे महापालिका निवडणुकांसाठी सज्ज, कशी असणार रणनीती?.
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा
निलेश राणे-रविंद्र चव्हाण यांच्यात भेट, मालवण निवडणुकीतील वादावर पडदा.
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध
तेजस्वी घोसाळकरांच्या पोस्टर दिवंगत पतीचा फोटो अन् ठाकरे सेनेचा विरोध.
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!
दोन्ही NCP च्या विलीनीकरणाची सुरुवात? निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र!.
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ...
आशिष शेलार यांच्या बडवे टीकेवरुन वादंग, थेट पंढरपुरातनं फोन अन् ....
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला
नाशिक भाजपात इनकमिंगवरून राडा, भाजपन देवयानी फरांदे यांचा विरोध डावलला.
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध
पुण्यातही मविआत फूट, NCP च्या एकत्रीकरणाला ठाकरेंनंतर काँग्रेसचा विरोध.
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम
ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा शिंदे सेनेला रामराम.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.