मोदींविषयीच्या ‘त्या’ व्हायरल विधानाबाबत पंकजा मुंडेंचं भाष्य, विचारांचा दाखला देत म्हणाल्या….

आयेशा सय्यद, Tv9 मराठी

|

Updated on: Oct 05, 2022 | 3:31 PM

Pankaja Munde : बीडच्या परळीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा झाला. यावेळी पंकजा यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. काय म्हणाल्या पाहा...

मोदींविषयीच्या 'त्या' व्हायरल विधानाबाबत पंकजा मुंडेंचं भाष्य, विचारांचा दाखला देत म्हणाल्या....

महेंद्र मुधोळकर, प्रतिनिधी, TV9 मराठी, परळी-बीड : बीडच्या परळीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा दसरा मेळावा झाला. यावेळी पंकजा यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी माझी राजकीय वाटचाल करत आहे. मी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा वारसा चालवत आहे. काही दिवसांआधी माझ्या भाषणातील एक अर्धवट क्लिप व्हायरल केली. मी माझ्या शत्रूविषयी सुद्धा वाईट बोलत नाही. तर ज्यांच्या विचारांचा वारसा चालवते. त्यांच्याविषयी मी वाईट कशी काय बोलू शकते? ते मी कधीच करू शकत नाही, असं पंकजा मुंडे (Pankaja Munde Dasara Melava) म्हणाल्या आहेत.

काही दिवसांआधी पंकजा मुंडे यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी बीडमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. 26 सप्टेंबर रोजी हा कार्यक्रम पार पडला होता. यात पंकजा मुंडेंनी भाषण केलं त्याची एक क्लिप प्रचंड व्हायरल झाली.

पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्देशून एक विधान केलं. मोदींना राजकारणातील वंशवाद संपवायचा असेल पण ते मला संपवू शकत नाहीत, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यानंतर पंकजा मुंडे भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर आज पंकजा मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पंकजा मुंडे यांनी आपल्या पुढच्या राजकीय वाटचालीवरही आजच्या दसरा मेळाव्यात भाष्य केलंय.आता मी कुठल्याही पदाची अपेक्षा करणार नाही. थेट 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला लागतेय. आता मी महाराष्ट्रभर दौरा करणार, अशी घोषणा पंकजा मुंडे यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI