AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir Ayodhya | ‘अयोध्येत प्राण प्रतिष्ठेच्यावेळी….’, पीएम मोदींनी मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की….

Ram Mandir Ayodhya | राम ललाचा प्राण प्रतिष्ठा कार्यक्रम 22 जानेवारीला होणार आहे. या दिवसाची अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्टपणे काही निर्देश दिले आहेत.

Ram Mandir Ayodhya | 'अयोध्येत प्राण प्रतिष्ठेच्यावेळी....', पीएम मोदींनी मंत्रिमंडळ बैठकीत स्पष्टपणे सांगितलं की....
ram mandir consecration ceremony pm narendra modi
| Updated on: Jan 09, 2024 | 1:16 PM
Share

Ram Mandir Ayodhya | अयोध्येत येत्या 22 जानेवारीला राम मंदिराचा भव्य प्राण प्रतिष्ठापना सोहळा रंगणार आहे. सगळ्या देशाच लक्ष या सोहळ्याकडे लागलं आहे. जगभरातील तमाम राम भक्त या क्षणाची आतुरतेने वाट पाहतायत. अनेक वर्षांपासूनच राम भक्तांच स्वप्न साकार होणार आहे. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमाआधी शुक्रवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात पीएम मोदींनी मंत्र्यांना अत्यंत कठोर निर्देश दिले आहेत. “प्रभू रामचंद्रांच्या प्राण प्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी सर्तक राहा. या सोहळ्यासाठी श्रद्धा दाखवा, आक्रमकता नको” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वादग्रस्त वक्तव्य टाळण्याच आणि मर्यादेच पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमा दरम्यान आपल्या मतदारसंघात कुठलीही गडबड होणार नाही, वातावरण खराब होणार नाही, याची काळजी घ्या असं पीएम मोदींनी सूचना दिल्या आहेत.

मोदीच्या निर्देशानंतर एक गोष्ट स्पष्ट

22 जानेवारीनंतर आपल्या क्षेत्रातील लोकांना राम ललाच्या दर्शनासाठी घेऊन या. जास्तीत जास्त लोकांना राम ललाचा आशिर्वाद मिळवून द्या, असं पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कठोर निर्देशानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आता संभाळून मत प्रदर्शन करतील, हे स्पष्ट आहे.

नरेंद्र मोदीच जनतेला काय अपील?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक भजन आपल्या टि्वटर हँडलवर शेअर केलय. प्रसिद्ध गायक हरिहरनच भजन शेअर करताना पंतप्रधान मोदींनी लिहिलय की, हरिहरन यांच्या अद्भुत सुरांनी सजलेल हे राम भजन ऐकल्यानंतर प्रत्येकजण राम भक्तीमध्ये लीन होईल. पंतप्रधानांनी जनतेला या भजनाचा आनंद घेण्याच अपील केलय.

फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.