AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कन्नड रक्षण वेदिकेच्या राड्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट, ठाकरे गट- मनसे आक्रमक, कुठे आंदोलन?

ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

कन्नड रक्षण वेदिकेच्या राड्यानंतर महाराष्ट्रात संतापाची लाट, ठाकरे गट- मनसे आक्रमक, कुठे आंदोलन?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 06, 2022 | 3:21 PM
Share

मुंबईः बेळगावात (Belgaum) महाराष्ट्राच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. कन्नड रक्षण वेदिका (Kannad Rakshan Vedika) संघटनेने केलेल्या या राड्यानंतर महाराष्ट्रातही संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. कर्नाटक सरकारच्या आडमुठे धोरणावर महाराष्ट्र सरकार (Maharashtra Goovernment) बोटचेपी भूमिका घेत असल्याची टीका ठाकरे गटाने वारंवार केली आहे. आता कन्नड रक्षण वेदिकेच्या हल्ल्यानंतर ठाकरे गटानेही आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर इचल करंजीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही आंदोलन केलं.

सांगली जिल्ह्यातील इचलकरंजी बस स्थानकात मनसेनं आंदोलन केलं. कर्नाटक गाडीच्या समोर केली निदर्शने महाराष्ट्रात कर्नाटकची एकही गाडी फिरू देणार नाही असा घेतला पवित्रा मनसेने घेतला आहे. कन्नड रक्षण वेदिकेने बेळगावात केलेल्या राड्याचा मनसेनं तीव्र निषेध केलाय. महाराष्ट्रातील मनसे आता जशास तसे उत्तर देणार, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी मांडली.

एसटी महामंडळ अलर्ट

बेळगाव मध्ये सुरू असलेल्या आंदोलनानंतर महाराष्ट्र एसटी प्रशासन सतर्क झाले आहे. जर कर्नाटक प्रशासन किंवा आंदोलन ठिकाणच्या स्थानिक प्रशासनाकडून राज्यांची सीमा ओलांडू दिली नाही तर महाराष्ट्रातून कर्नाटक कडे जाणाऱ्या बस थांबवल्या जातील. एसटी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी ही माहिती दिली आहे.

ठाकरे गटही आक्रमक..

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पेटल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पुन्हा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पुणे बेंगलोर महामार्गावर कोगनोळी जवळ शिवसेना ठाकरे गट आंदोलन करणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि कर्नाटकचे पोलीसही सीमेवर तैनात आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन होणार आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.