VIDEO | बेळगावचा नवनिर्वाचित नगरसेवक ‘कृष्णकुंज’वर, राज ठाकरेंनी पाठ थोपटली

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवक रवी साळुंखे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. रवी साळुंखे हे मनसेचे बेळगावमधील पदाधिकारी आहेत

VIDEO | बेळगावचा नवनिर्वाचित नगरसेवक 'कृष्णकुंज'वर, राज ठाकरेंनी पाठ थोपटली
राज ठाकरेंकडून रवी साळुंखेंचा सत्कार


मुंबई : बेळगांव महानगरपालिका निवडणुकीत (Belgaum Municipal Corporation) विजयी झालेले नवनिर्वाचित नगरसेवक रवी साळुंखे (Ravi Salunkhe) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. मुंबईत राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी रवी साळुंखे आणि त्यांचे सहकारी आले होते. या भेटीचा व्हिडीओ समोर आला आहे.

रवी साळुंखे मनसेचे बेळगावमधील पदाधिकारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवक रवी साळुंखे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हेसुद्धा उपस्थित होते. रवी साळुंखे हे मनसेचे बेळगावमधील पदाधिकारी आहेत. येत्या 15 दिवसात बेळगावमधील पदाधिकाऱ्यांची राज ठाकरे यांच्यासोबत बैठक होणार आहे.

अविनाश जाधवांशी भेट

रवी साळुंखेंच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल मनसे ठाणे जिल्हा अध्यक्ष कार्यालयात जाऊन अविनाश जाधव यांचीही भेट घेतली होती. यावेळी जाधवांनीही त्यांचा सत्कार केला होता.

रवी साळुखेंची एकनाथ शिंदेंशीही भेट

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मराठी भाषिक आमदार निवडून यावे, म्हणून रणनीती आखण्यासाठी रवी साळुंखे यांनी शिवसेनेचे नेते आणि बेळगाव सीमा समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली होती. तसेच शिंदेंनी बेळगावात यावे, अशी विनंतीही साळुंखे यांनी केली. एकनाथ शिंदेंनी त्यांना दौऱ्याबाबत आश्वस्त केले.

पाहा व्हिडीओ :

बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत (Belgaum Municipal Carporation) महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 35 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. पहिल्यांदाच पक्षपातळीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यामुळे आता बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.

बेळगाव महापालिकेत नवख्या नगरसेवक-सेविकांचा भरणा

बेळगाव महापालिका निवडणुकीत केवळ 4 नगरसेवक वगळता उर्वरित नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे महापालिका सभागृहात नवख्या नगरसेवक-सेविकांचा भरणा राहणार आहे. विशेष म्हणजे यात महिलांची संख्याही अधिक आहे.

54 नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करणार

माजी नगरसेवक मुजम्मिल डोणी आणि रवी धोत्रे यांनी तिसऱ्यांदा, अजीम पटवेगार दुसऱ्यांदा तर गिरीश धोंगडी (याआधी सरकारनियुक्त) यांनी निवडणुकीत विजय मिळवून महापालिकेत पुन्हा प्रवेश केला आहे. तर उर्वरित 54 नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सभागृहात अननुभवी नगरसेवक-सेविकांचा भरणा राहणार आहे.

महापालिका निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले होते. तर समितीनेही काही माजी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनाही रिंगणात उतरवले होते. मात्र, यापैकी एकही निवडून आला नाही. यामुळे सभागृहातील कामकाज या नवख्या नगरसेवकांच्या उपस्थितीत चालणार आहे.

संबंधित बातम्या  

मराठी माणूस हरल्यावर पेढे वाटता, लाज वाटत नाही, बेळगावच्या भाजपच्या विजयावर राऊतांचा संताप

बेळगावमध्ये निवडून आलेले पेडणेकर, जाधव, कांबळे, धोत्रे, पाटील हे मराठी माणसं वाटत नाही का?; पडळकरांचा राऊतांना सवाल

बेळगाव महापालिकेवर भाजपची सत्ता, 54 नगरसेवक पहिल्यांदाच सभागृहात प्रवेश करणार, चारच नगरसेवक ‘पुन्हा आले’!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI