AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेळगाव महापालिकेवर भाजपची सत्ता, 54 नगरसेवक पहिल्यांदाच सभागृहात प्रवेश करणार, चारच नगरसेवक ‘पुन्हा आले’!

बेळगाव महापालिका निवडणुकीत केवळ 4 नगरसेवक वगळता उर्वरित नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे महापालिका सभागृहात नवख्या नगरसेवक-सेविकांचा भरणा राहणार आहे. विशेष म्हणजे यात महिलांची संख्याही अधिक आहे.

बेळगाव महापालिकेवर भाजपची सत्ता, 54 नगरसेवक पहिल्यांदाच सभागृहात प्रवेश करणार, चारच नगरसेवक 'पुन्हा आले'!
बेळगाव महापालिका
| Edited By: | Updated on: Sep 08, 2021 | 7:40 AM
Share

मुंबई :  बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत (Belgaum Municipal Carporation) महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 35 वर्षांच्या वर्चस्वाला सुरुंग लागला आहे. पहिल्यांदाच पक्षपातळीवर झालेल्या या निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यामुळे आता बेळगाव महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकला आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागलं.

बेळगाव महापालिकेत नवख्या नगरसेवक-सेविकांचा भरणा

बेळगाव महापालिका निवडणुकीत केवळ 4 नगरसेवक वगळता उर्वरित नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत. त्यामुळे महापालिका सभागृहात नवख्या नगरसेवक-सेविकांचा भरणा राहणार आहे. विशेष म्हणजे यात महिलांची संख्याही अधिक आहे.

54 नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करणार

माजी नगरसेवक मुजम्मिल डोणी आणि रवी धोत्रे यांनी तिसऱ्यांदा, अजीम पटवेगार दुसऱ्यांदा तर गिरीश धोंगडी (याआधी सरकारनियुक्त) यांनी निवडणुकीत विजय मिळवून महापालिकेत प्रवेश केला आहे. तर उर्वरित 54 नगरसेवक पहिल्यांदाच महापालिकेच्या सभागृहात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे सभागृहात अनुनभवी नगरसेवक-सेविकांचा भरणा राहणार आहे.

महापालिका निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्षांनीही आपले उमेदवार उभे केले होते. तर समितीनेही काही माजी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांनाही रिंगणात उतरविले होते. मात्र, यापैकी एकही निवडून आला नाही. यामुळे सभागृहातील कामकाज या नवख्या नगरसेवकांच्या उपस्थितीत चालणार आहे.

चारच नगरसेवक ‘पुन्हा आले’!

महापालिकेच्या नव्या सभागृहात माजी नगरसेवक मुजम्मिल डोणी यांनी प्रभाग क्रमांक 2 मधून विजय मिळवला आहे. तर याआधी सरकार नियुक्त नगरसेवक राहिलेले गिरीश धोंगडी यांनी प्रभाग क्रमांक 24 मधून यंदा भाजपच्या चिन्हावर विजय मिळविला आहे. माजी नगरसेवक रवी धोत्रे यावेळी प्रभाग क्रमांक 28 मधून पुन्हा विजयी झाले आहेत. तर अजीम पटवेगार यांनीही प्रभाग क्रमांक 38 मधून विजयश्री खेचून आणला आहे.”

महापालिकेच्या एकूण 58 प्रभागांपैकी हे चारच अगोदरचे नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे यावेळचे सभागृह कसे चालणार, हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे. तर संपूर्ण सभागृहावर दक्षिण तसेच उत्तरच्या आमदारांचे वर्चस्व राहणार का, हे पाहणेही औत्सुक्याचे राहणार आहे. नवख्या नगरसेवकांना महापालिका कामकाजाची माहिती जाणून घेण्यासह सभागृहात आपल्या प्रभागातील विविध समस्या मांडून त्या सोडवून घेण्यासाठी काही दिवस अभ्यास करावा लागणार आहे.

बेळगाव महानगरपालिकेतील विजयी उमेदवार

  • 1 इकरा मुल्ला- अपक्ष 2-मुजमिल डोनी काँग्रेस 3-ज्योती कडोलकर काँग्रेस 4- जयतीर्थ सौदत्ती भाजप 5-हाफीझा मुल्ला काँग्रेस 6-संतोष पेडणेकर भाजप 7-शंकर पाटील अपक्ष 8-महंमद संगोळी- काँग्रेस 9-पूजा पाटील अपक्ष 10- वैशाली भातकांडे समिती 11-समीउल्ला माडीवाले काँग्रेस 12-मोदीनसाब मतवाले अपक्ष 13- रेश्मा भैरकदार काँग्रेस 14- शिवाजी मंडोळकर समिती 15- नेत्रावती भागवत भाजप 16- राजू भातकांडे भाजप 17- सविता कांबळे भाजप 18- शाहीदखन पठाण एम आय एम 19- रियाज किल्लेदार अपक्ष 20 शकीला मुल्ला काँग्रेस 21 प्रीती कामकर भाजप 22 रवी सांबरेकर भाजप 23 जयंत जाधव भाजप 24 गिरीश धोंगडी भाजप 25 जरीना फतेखान अपक्ष 26 रेखा हुगार भाजप 27 रवी साळुंके समिती 28 रवी धोत्रे भाजप 29 नितीन जाधव भाजप 30 ब्रामहानंद मिरजकर भाजप 31- वीणा विजापुरे भाजप 32-संदीप जिरग्याल भाजप 33- रेश्मा पाटील भाजप 34 श्रेयस नाकाडी भाजप 35 लक्ष्मी राठोड भाजप 36 राजशेखर डोनी भाजप 37 शामोबिन पठाण काँग्रेस 38 अजीम पटवेगार अपक्ष 39 उदयकुमार उपरी भाजप 40 रेश्मा कामकर भाजप 41 मंगेश पवार भाजप 42 अभिजित जवळकर भाजप 43 वाणी जोशी भाजप 44 आनंद चव्हाण भाजप 45 रूपा चिक्कलदींनी भाजप 46 हणमंत कोंगाली भाजप 47 अस्मिता पाटील अपक्ष 48 बसवराज मोदगेकर समिती 49 दीपाली टोपगी भाजप 50 सारिका पाटील भाजप 51- श्रीशैल कांबळे भाजप 52 खुर्शीदा मुल्ला काँग्रेस 53 रमेश मैलुगोळ भाजप 54 माधवी राघोचे भाजप 55 सविता पाटील भाजप 56 लक्ष्मी लोकरी काँग्रेस 57 शोभा सोमनाचे भाजप 58 प्रिया सातगौडा भाजप
  • बेळगाव महानगरपालिकेतील विजयी उमेदवार

(Belgaum Municipal Carporation Election 54 Carporator Newly Elected 4 Carporator Again Elected)

हे ही वाचा :

शिवाजीराजांच्या अटकेनंतर आनंद व्यक्त करणाऱ्या जमातीने, मराठी माणसाच्या पराभवानंतर पेढे वाटले, राऊतांचा भाजपवर हल्ला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.