Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! राज्यपालांना कोरोनाची लागण, रिलायन्स रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाली.

Bhagat Singh Koshyari : मोठी बातमी! राज्यपालांना कोरोनाची लागण, रिलायन्स रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर
राज्यपाल भगतसिंह कोश्यारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 9:35 AM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली असल्याची माहिती समोर आली. त्यांना कोरोना सदृष्य लक्षणं दिसू लागल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली. रिलाईन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रासह मुंबईत (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून एकीकडे कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय वारेही वेगानं वाहू लागलेत. या सगळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचीही भूमिका महत्त्वाची ठरते. त्यातच एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते. दुपारी घेण्यात येणाऱ्या या भेटीदरम्यान, महत्त्वपूर्ण घडामोडी घडतील, अशी शक्यता होती. पण त्याआधीच मोठी घडामोड समोर आली असून आता एकनाथ शिंदे मुंबईला जाणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

शिंदे-राज्यपालांच्या भेटीत अडथळा?

राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे गटानं बंड केला असून शिंदे आज राज्यपालांना भेटणार आहेत. ते यासाठी मुंबईत येणार आहेत. मात्र, त्यापूर्वी राज्यपालांना कोरोनाची लागण झाली आहे. शिंदे यांचा विचार केला तर संख्याबळाचं समीकरण जुळतं का, याकडे सगळ्यांचं लक्ष राहिलेलं होतं. दोन तृतीआंश आमदारांपेक्षा जास्त संख्याबळ हे एकनाथ शिंदेसोबत असणं गरजेचं होतं. 37 हा आकडा एकनाथ शिंदे यांना गाठायचा होता. आता त्यांनी स्वतःच आपल्याकडे 40 आमदार असल्याचं म्हटलंय. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा हादरा बसलाय.

हे सुद्धा वाचा

सत्तास्थापनेचा भाजपसोबत दावा एकनाथ शिंदे करतील, अशी शक्यता आहे. त्यासाठी ते मुंबईमध्ये दुपारी येतील. राज्यपालांची भेट घेतली, असंही सांगितलं जातं आहे. एका विशेष विमानाने एकनाथ शिंदे हे मुंबईला येणार असल्याचं कळतंय. मात्र, राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यानं भेटीत अडथळा तर येत नाही ना, असाही प्रश्न सध्या चर्चेत आहे.

भाजपकडून सत्तेसाठी प्रयत्न?

भाजप नेते मोहित कंबोज बंडखोर शिवसेनेच्या आमदारांसोबत धावपळ का करत होते, त्यांच्यासोबत आमदार संजय़ कुटे का आहेत? या प्रश्नांची उत्तर मात्र भाजपानं दिलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा भाजपवर संशयाचं वातावरण निर्माण झालंय. तर दुसरीकडे हा भाजप-शिवसेना युतीचा तर डाव नाही ना, बंडखोर शिवसेना आमदार भाजपसोबत तर जाणार नाही ना, असे प्रश्न देखील सध्या चर्चेत आहे. दुसरीकडे माध्यमांशी बोलताना काही आमदारांनी जय महाराष्ट्र देखील म्हटलंय. याचा अर्थ हा शिवसेनेला कायमचा जय महाराष्ट्र तर नव्हता ना, अशाही प्रश्नाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.