AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loksabha Election 2024 | देशातील एका महत्त्वाच्या राज्यात भाजपाची लोकसभेसाठी सीट शेअरींगची डील पक्की

Loksabha Election 2024 | एका महत्त्वाच्या राज्यात भाजपाची जागा वाटपाची बोलणी पक्की झालीय. भाजपा या राज्यात लोकसभेच्या 20 जागा लढवणार आहे. भाजपाने रणनिती अशी आखलीय की, त्यात छोट्या घटक पक्षांचा आणि त्यांचा दोघांचा फायदा आहे.

Loksabha Election 2024 | देशातील एका महत्त्वाच्या राज्यात भाजपाची लोकसभेसाठी सीट शेअरींगची डील पक्की
modi shah
| Updated on: Feb 15, 2024 | 12:45 PM
Share

Loksabha Election 2024 | आगामी लोकसभा निवडणूक 2024 ला आता फक्त काही महिने उरले आहेत. बहुतांश पक्षांनी युत्या-आघाड्या केल्या आहेत. कोण किती जागांवर निवडणूक लढणार हे जवळपास पक्क होत आलाय. मुख्य सामना भाजपा आणि प्रादेशिक पक्षांमध्ये आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष इंडिया आघाडी बनवून एकवटले होते. पण लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरुन इंडिया आघाडीत फूट पडली. आता इंडिया आघाडी फक्त नावाला उरलीय. ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लढणार असल्याच जाहीर केलय. अरविंद केजरीवाल यांची आप पार्टी पंजाबमध्ये जागा सोडायला तयार नाहीय. त्याचवेळी नितीश कुमार पुन्हा स्वगृही एनडीएमध्ये परतले आहेत. त्यामुळे भाजपा विरुद्ध प्रादेशिक पक्ष असाच सामना रंगणार आहे.

दरम्यान एका महत्त्वाच्या राज्यात NDA ची जागा वाटपाची बोलणी फायनल झाल्याची माहिती आहे. बिहारमध्ये यावेळी भाजपा 20 लोकसभा जागांवर निवडणूक लढणार आहे. 20 पैकी भाजपा 2 जागा पारस गटाला देणार आहे. पण पारस गटाला भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यासाठी तयार राहील पाहिजे. पारस गटाला दिल्या जाणाऱ्या 2 जागांपैकी एक प्रिन्स राज आणि दुसरी जागा सूरजभान सिंहच्या पत्नीला दिली जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार पशुपतिनाथ पारस यांना सरकारमध्ये वेगळी भूमिका दिली जाऊ शकते.

ते एनडीए सोबतच राहणार

चिराग पासवान यांची एलजेपी (रामविलास) पार्टी पाच जागांवर लोकसभेची निवडणूक लढणार आहे. ते आणखी एका राज्यसभेच्या जागेची मागणी करत होते. पण भाजपा राज्यसभेसाठी तयार नाहीय. एलजेपी (रामविलास) पाच जागा मिळणार असल्याने ते एनडीए सोबतच राहणार आहेत.

त्यात भाजपा आणि घटक पक्ष या दोघांचा फायदा

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा जेडीयूला लोकसभेच्या 12 जागा देणार आहे. बिहारमध्ये नितीश कुमार 2025 विधानसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्रीपदावर कायम राहतील. पण लोकसभेला जेडीयूला 12 जागांवर समाधान मानाव लागेल. रालोसपाचे उपेन्द्र कुशवाहा एनडीएसोबतच राहणार आहेत. त्यांना एनडीएकडून दोन जागा देण्यात येतील. बिहारच्या राजकारणात सध्याच्या स्थितीत भाजपाने छोट्या घटक पक्षांना आपल्यासोबत जोडलय. त्यात भाजपा आणि घटक पक्ष या दोघांचा फायदा आहे. यामुळे मतविभाजन टळणार आहे. उमेदवाराच्या विजयाची शक्यता अधिक आहे. ममता बॅनर्जी, नितीश कुमार बाहेर पडल्याने इंडिया आघाडीच बळच संपून गेलय.

जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.