AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का?, जनाब सेनेचा कांगावा उघड झालाय; भातखळकरांचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा

सध्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीचा मुद्दा चागलाच गाजत आहे. याकूब मेमनची कबर फुलाने सजवल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.  याच मुद्द्यावरून भाजपकडून (BJP) शिवसेनेला (Shiv Sena) कोंडित पकडण्याचा प्रयत्न होत आहे.

उद्धव ठाकरे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का?, जनाब सेनेचा कांगावा उघड झालाय; भातखळकरांचा पुन्हा शिवसेनेवर निशाणा
| Updated on: Sep 10, 2022 | 10:53 AM
Share

मुंबई :  सध्या मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या (Yakub Memon) कबरीचा मुद्दा चागलाच गाजत आहे. याकूब मेमनची कबर फुलाने सजवल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.  याच मुद्द्यावरून भाजपकडून (BJP) शिवसेनेला (Shiv Sena) कोंडित पकडण्याचा प्रयत्न होत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेकडून देखील भाजपावर आरोप करण्यात येत आहेत. आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असतानाच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर ट्विट करत जोरदार निशाणा साधाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री जनाब उद्धव ठाकरे यांच्या विशेष कृपा प्रसादाचे मानकरी दाऊद टोळीचे मालमत्ता प्रमुख नवाब मलिक यांनीच याकुबच्या कबरीचे प्रकरण दडवल्याचा आरोप भातखळकर यांनी केला आहे.

नेमकं काय म्हटलंय भातखळकर यांनी?

”मुख्यमंत्री जनाब उध्दव ठाकरे यांच्या विशेष कृपा प्रसादाचे मानकरी दाऊद टोळीचे मालमत्ता प्रमुख नवाब मलिक यांनीच याकुबच्या कबरीचे प्रकरण दडपले होते. उध्दव ठाकरे हे मेमन कुटुंबियांवर एवढे मेहेरबान का होते? वक्फ बोर्डाकडे तक्रार झाल्यानंतरही सरकार अळीमिळी करून का बसले?” असं ट्विट त्यांनी केलं आहे.

आदित्य ठाकरेंवर निशाणा

याच दरम्यान त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. त्यांनी या ट्विटमधून आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ”जनाब सेनेचा कांगावा उघड झालाय… 2020 मध्ये टायगर मेमनने कब्रस्तानच्या ट्रस्टीला धमकावले होते. परंतु दाऊद टोळीचे माफिया हे राज्याचे वाजिरे आझम जनाब ‘घरंदाज उदौला’ यांचे जावई असल्यामुळे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. नंतर कबर सजवण्यात आली. तरीही शाहजादे आमच्याकडे बोट दाखवतायत”. असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.