मोठी बातमी ! भाजपचा चिपी विमानतळ उद्घाटनावर बहिष्कार, दोन्ही विरोधी पक्षनेते कार्यक्रमाला जाणार नाहीत

सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या 9 ऑक्टोबर रोजी होत आहे. पण या विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या दोघांनाही अद्याप मिळालेलं नाही.

मोठी बातमी ! भाजपचा चिपी विमानतळ उद्घाटनावर बहिष्कार, दोन्ही विरोधी पक्षनेते कार्यक्रमाला जाणार नाहीत
देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर

मुंबई : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन उद्या 9 ऑक्टोबर रोजी होत आहे. पण या विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर या दोघांनाही अद्याप मिळालेलं नाही. प्रविण दरेकर यांनी स्वत: याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे भाजप या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती स्वत: प्रविण दरेकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे. त्यामुळे चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्यावरुन मानापमान नाट्य रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

प्रविण दरेकर नेमकं काय म्हणाले?

विधान परिषेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या कार्यक्रमावरून नाराजी व्यक्त केली आहे. चिपी विमानतळाच्या कार्यक्रम पत्रिकेवर आमच्या दोघांचीही नावे नाहीत. देवेंद्र फडणवीस यांचे तर विमानतळाच्या बांधकामात योगदान असताना त्यांचेही नाव नाही. त्यामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की हे सरकार राजकीय अभिनिवेशातूनच वागत असते. कार्यक्रम पत्रिकेवर नाव तर नाहीच परंतु, आतापर्यंत या कार्यक्रमाचे निमंत्रण सुद्धा आम्हाला आलेले नाही, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

राणेंची शिवसेनेवर टीका

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर घणाघाती टीका केली. माणसाने संकुचित किती असावं बघा. चिपी विमानतळाची कार्यक्रम पत्रिका छापली आहे. त्यात माझं नाव बारीक अक्षरात छापलं आहे. त्यावर शाईही फाटली आहे. शिवाय माझं नावही तिसऱ्या क्रमांकावर टाकलं आहे. मी राजकारणात आणि प्रोटोकॉलमध्येही मी दोघांपेक्षा सीनियर आहे. पण ठिक आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांना पहिला मान दिला काही हरकत नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री कोण आहे हे महत्त्वाचं नाही. माझं नाव बारीक का झालं हे माहीत नाही. ही एक वृत्ती आहे, असं राणे म्हणाले.

नारायण राणेेंना शिवसेनेकडून प्रत्युत्तर

दरम्यान, नारायण राणेंच्या टीकेला शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “सरकारला प्रोटोकॉल कळतो. त्याप्रमाणेच निमंत्रण पत्रिका दिली आहे. विकास कामांवर बोलत आहात. तुम्ही काय विकास केला ते आधी बघा. ज्यांना सूक्ष्म खातं देण्यात आलं आहे त्यांचं नाव निमंत्रण पत्रिकेवरही तसंच टाकलं आहे. त्यांनी जिल्ह्याचा नाही तर व्यक्तिगत विकास जास्त केलाय. ते यादी जाहीर करणार म्हणत आहेत, तर त्यांनी स्वत:चं नाव सर्वात वर टाकावं”, असा टोला अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

हेही वाचा :

चिपी विमानतळाच्या निमंत्रण पत्रिकेवरुन राजकारण पेटणार? राणेंच्या टीकेला अरविंद सावंतांचं प्रत्युत्तर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI