AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही; चंद्रकांतदादांचं मोठं विधान

शरद पवार यांनी नेहमीच नैतिकतेचे राजकारण केलं आहे. त्यांचं राजकारण शुद्ध मानलं जातं. त्यांनी नेहमीच नैतिकतेला प्राधान्य दिलं, असं असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही; चंद्रकांतदादांचं मोठं विधान
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 13, 2021 | 7:01 PM
Share

मुंबई :  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नेहमीच नैतिकतेचे राजकारण केलं आहे. त्यांचं राजकारण शुद्ध मानलं जातं. त्यांनी नेहमीच नैतिकतेला प्राधान्य दिलं, असं असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसंच नैतिकतेच्या मुद्द्यावर सामाजिक न्यायविकास मंत्री धनंजय मुंडेंनी स्वत:हून राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. (Bjp Chandrakant Patil On Sharad pawar And Dhananjay Munde rape Case)

शरद पवारांचं राजकारण शुद्ध, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले नाही. पवारांचं राजकारण नेहमी नैतिकतेचं राहिलं आहे. त्यामुळे ते धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतील असा विश्वास आहे, असं पाटील म्हणाले.

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपींची चौकशी होईलच. पण मुंडे यांनी स्वत: कबुली दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. त्यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.

चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या राजकारणाचं मोठंपण सांगताना धनंजय मुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. पवारांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत शुद्ध राजकारण केलं, असं सांगताना नैतिकपणा जपत मुंडेंनी मंत्रिमंडळातून बाजूला व्हावं, अशी भूमिका चंद्रकांतदादांनी मांडली.

याप्रकरणी प्रथम आरोपीला अटक करायला हवी तसंच निवडणूक आयोग यावर नक्की कारवाई करेल, हे जरी आत्ता सांगता येत नसलं तरी मुंडे यांनी घटनेच्या चौकटीत बसणारं काम केलं नाही त्यामुळे निवडणूक आयोगाने दाखल घेण्यासारखं हे प्रकरण आहे, असं मतंही त्यांनी व्यक्त केलं.

धनंजय मुंडे यांना प्रथमत: आवाहन करेल की माणूस म्हणून चूक घडू शकते. पण नैतिकतेने ते कायद्यात बसणार नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. खूप राजकीय जीवन त्यांना जगायला मिळाले. या राजकीय जीवनात मंत्री न राहता नॉर्मल कार्यकर्ता म्हणून काम करायला वाव आहे. त्यांनी राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंबहुना शरद पवारांनी त्यांचा राजीनामा घ्यावा. जर राजीनामा घेतला नाही तर राज्यभर भाजप आंदोलन करेल, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.

विरोधी पक्षाला जिथे चुकीचं होईल तिथे विरोधाची भूमिका दिलेली असते. एक दंडशक्ती तसंच एक अंकुशशक्ती म्हणून विरोधी पक्षाने काम करायचं असतं. या शक्तीने जे चुकीचे चाललं आहे. त्याचा जाब विचारायचं असतं. लोकांनी ती जबाबदारी दिलेली असते. आम्ही तेच काम करतोय, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

(Bjp Chandrakant Patil On Sharad pawar And Dhananjay Munde rape Case)

संबंधित बातम्या

विरोधकांनी स्वत:ला आरशात पाहावे; मुंडेंच्या राजीनाम्यावरून अमोल कोल्हेंची टीका

बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे शरद पवारांच्या भेटीला

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...