‘शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट’, भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचं टीकास्त्र

राज्य सरकारने तातडीने शुल्क निश्चिती करून शाळांना चाप लावावा, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

'शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट', भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचं टीकास्त्र
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
Follow us
| Updated on: Jul 14, 2021 | 3:54 PM

मुंबई : उच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारच्या शिक्षण धोरणाविषयी वारंवार कानउघडणी करूनही त्याकडे सपशेल कानाडोळा करण्यात आला. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ मांडत राज्याची शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट घातला आहे, असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. राज्य सरकारने तातडीने शुल्क निश्चिती करून शाळांना चाप लावावा, अशी मागणीही त्यांनी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Keshav Upadhyay criticizes the Mahavikas Aghadi government’s education policy)

उपाध्ये म्हणाले की, अलिकडेच उच्च न्यायालयाने तुम्हाला शिक्षणाचा खेळखंडोबा करायचा आहे का? अशा भाषेत राज्य सरकारची कानउघडणी केली होती. उच्च न्यायालयाने केलेली कानउघाडणी लक्षात घेऊन शिक्षण धोरणात सुधारणा करण्याऐवजी राज्य सरकार त्याकडे सपशेल दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. शाळा कधी आणि कशा प्रकारे सुरू करणार, खासगी शाळांकडून केली जाणारी अवाजवी शुल्क आकारणी, अभ्यासक्रमातील घोळ, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन कशा प्रकारे करणार, अशा कोणत्याच मुद्द्यावर या सरकारचे धोरण स्पष्ट नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना शिक्षण विषयाचे काही गांभीर्य आहे की नाही? असा गंभीर सवाल उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला विचारलाय.

‘राज्य सरकारच्या दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका’

‘शिक्षणा संबंधिच्या कोणत्याच मुद्द्याच्या बाबतीत सरकारचं धोरण स्पष्ट नसल्यानं संस्थाचालक अवाजवी शुल्क आकारून पालकांची लुट करत असल्याच्या तक्रारी आहेत. राईट टू एज्युकेशन या कायद्यानुसार दिले जाणारे प्रवेशही अनेक शाळांनी नाकारले आहेत. राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा दिला नसल्याने असे प्रवेश नाकारले आहेत, असं शिक्षण संस्थांनी स्पष्ट केलंय. राज्य सरकारच्या दिरंगाईचा विद्यार्थ्यांना फटका बसत आहे, अशी टीकाही त्यांनी केलीय.

‘विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकारने खेळू नये’

बारावी विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कोणत्या आधारावर केले जाणार यामध्ये अजुनही स्पष्टता नाही. ‘सीबीएसई’ ची मुल्यांकनाची स्वत:ची प्रणाली आहे. तशी पध्दत आपल्या शिक्षण मंडळांनी अद्याप तयार केलेली नाही. राज्य सरकारच्या या सगळ्या सावळ्या गोंधळाचा फटका विद्यार्थ्यांना बसतोय. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सरकारने खेळू नये, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावलाय.

संबंधित बातम्या :

कुणाच्याही नेतृत्वात लढा, भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकणारच; चंद्रकांत पाटलांचा काँग्रेसला टोला

VIDEO: फडणवीस सरकारचे चिठ्ठे बाहेर आले तर फडणवीसही अडचणीत येतील; नाना पटोलेंचा मोठा गौप्यस्फोट

Keshav Upadhyay criticizes the Mahavikas Aghadi government’s education policy

फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ
फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब, पण शिरसाटांच्या त्या वक्तव्यान खळबळ.
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला
हार असो वा जीत... महायुतीत टार्गेट 'अजित'? लोकसभेत भाजप अन् विधानसभेला.
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान
मारकडवाडीत फेरमतदान की घमासान रंगणार? EVM वर शंका अन् स्वखर्चानं मतदान.
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम
शिंदेंना गृहखात्यावरून भाजपचा स्पष्ट संदेश, शिवसेनेचा हट्ट पण भाजप ठाम.
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले...
आझाद मैदानावर कोणाचा शपथविधी ? प्रवीण दरेकर म्हणाले....
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ
गृहमंत्रीपदावरून कोणताही पेच नाही - छगन भुजबळ.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट , कधीपर्यंत सुरू राहणार ही योजना ?.
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?
Shrikant Shinde : ती चर्चा बिनबुडाची - श्रीकांत शिंदे कशाबद्दल बोलले?.
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट
पंतप्रधान मोदी आज पाहणार हा चर्चेतला चित्रपट.
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी
सोनू सूद मदतीला धावला, अन् तिला पुन्हा मिळाली नवी दृष्टी.