भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण? फडणवीस-चंद्रकांत पाटलांची घोषणा

आशिष शेलार यांची भाजपचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्या व्यतिरिक्त देवयानी फरांदे यांची प्रतोद म्हणून निवड करण्यात आली आहे.

भाजपचे विधानसभेतील मुख्य प्रतोद कोण? फडणवीस-चंद्रकांत पाटलांची घोषणा

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांची विधानसभेतील मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती (BJP Chief Whip) करण्यात आली आहे. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आशिष शेलार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आशिष शेलार यांची नियुक्ती जाहीर केली. आशिष शेलार यांच्या व्यतिरिक्त देवयानी फरांदे यांची प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या अंमलबजावणीवरुन केवळ सरकार वाचवण्यासाठी शिवसेना भूमिका बदलत असेल, तर भाजप शिवसेनेसाठी राजकीय तडजोड करायला तयार आहे, अशी खुली ऑफर आशिष शेलार यांनी कालच दिली होती.

व्हीप म्हणजे नेमकं काय?

सरकार वाचवणं हाच जर शिवसेनेचा मुद्दा असेल, तर भाजप राजकीय तडजोड करेल, मग शिवसेनेला महाविकास आघाडीत राहून तो निर्णय घ्यायचा असू दे, किंवा बाहेर पडून, असं आशिष शेलार म्हणाले होते.

आशिष शेलार हे मुंबईतील वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आमदार आहेत. वांद्रे पश्चिम सारख्या बहुभाषिक मतदारसंघात कोणे एके काळी काँग्रेसची सत्ता होती. मात्र 2014 मध्ये भाजपने खेचून आणलेल्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात शेलार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. त्यानंतर वांद्रे पश्चिम मतदारसंघात कमी मतदानाची नोंद झालेली असतानाही आशिष शेलार यांना आपला गड राखण्यात यश आलं.

फडणवीस सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलात विनोद तावडे यांच्याकडील शालेय शिक्षण मंत्रिपदाची धुरा काढून आशिष शेलार यांच्याकडे सोपवण्यात आली होती.

देवयानी फरांदे या भाजपच्या तिकीटावर नाशिक मध्य मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. फरांदे सलग दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्या आहेत.

BJP Chief Whip

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI