AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध’, चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्ला सुरुच

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेवरुन सामनामधून अग्रलेख लिहित केंद्र सरकावर टीका केली होती. आज राऊतांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेत्या चित्रा वाघ राऊतांवर जोरदार बरसल्या. | Chitra Wagh Sanjay Raut

'सर्वोच्च ज्ञानी सोनिया सेनेच्या प्रवक्त्यांचा जावईशोध', चित्रा वाघ यांचा संजय राऊतांवर हल्ला सुरुच
भाजप नेत्या चित्रा वाघ, शिवसेना खासदार संजय राऊत
| Edited By: | Updated on: Jul 18, 2021 | 9:39 AM
Share

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राष्ट्रीय नेत्यांच्या सुरक्षेवरुन सामनामधून अग्रलेख (Saamana Editorial) लिहित केंद्र सरकावर टीका केली होती. आज राऊतांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) राऊतांवर जोरदार बरसल्या. ‘सोनिया सेनेचे प्रवक्ते ‘असा उल्लेख करत ‘राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत आपण मुंबईची चिंता करा’, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावलाय.

‘सुरेक्षाचा विषय मोठा, आपल्याला कितपत आणि कसा समजेल?’

सर्वोच्च ज्ञानी व सोनिया सेनेचे प्रवक्ते संजय राऊत ह्यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देशातील तमाम बड्या नेत्यांना देण्यात आलेली सुरक्षा अनाठायी आहे असा जावईशोध लावला आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर अत्यंत परखड भूमिका मोदीजी घेत असतात. अशावेळी त्यांची सुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षेचा विषय असतो… हे आपल्याला कितपत व कसे समजेल हे मला सांगता येणार नाही कारण हा विषय खूप मोठा आहे, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राऊतांची खिल्ली उडवलीय.

‘आपणास वाटतंय तर मुख्यमंत्र्यांची सुरक्षा काढून घ्या…’

तरी आपणास असं खरेच वाटत असेल तर आपल्या राज्याचे सन्माननीय यांची सुरक्षा काढून घ्यावी आणि स्वतःपासून आदर्श घालून द्यावा असा प्रयोग करायला काय हरकत आहे?, गेली दीड वर्ष मा.मुख्यमंत्रीजी हे त्यांचा बराच वेळ मातोश्री निवासस्थानी किंवा वर्षा या शासकीय बंगल्यावरच व्यतित करतात… ते कुठे फारसे फिरत नाहीत त्यामुळे सध्या त्यांच्या सुरक्षेची तेवढी काळजी नाही, असा टोला चित्रा वाघ यांना लगावलाय.

आपल्या ज्ञानज्योतीचा प्रकाश मुंबईच्या प्रश्नांवर पाडावा

तसेही आपले राष्ट्रीय पातळीवरील अस्तित्व बिहार निवडणुकीत मिळालेल्या मतांमुळे जनतेपुढे आलेले आहे. यामुळे आपल्याला मला सांगायचंय संजयजी की राष्ट्राची चिंता करण्यासाठी मोदीजी सक्षम आहेत. आपण आपले ज्ञान राज्य पातळीवर उपयोगात आणावे. कारण लोकल बंद झाल्यामुळे जनतेची दैनंदिनी बिघडली आहे… त्यांना हेलपाटा मारावा लागतोय.. जरा जास्त पाऊस पडला तर मुंबईची तुंबई होते.. या समस्यांवर आपल्या ज्ञानज्योतीचा प्रकाश पाडावा, असे खोचक टोले टोमणे चित्रा वाघ यांनी राऊतांना लागवेल आहेत.

राऊतांनी अग्रलेखात काय म्हटलं होतं…?

शनिवारच्या सामना अग्रलेखातून राजकीय नेत्यांची सुरक्षाव्यवस्था, त्यांच्या सुरक्षेविषयी घेतली जाणारी काळजी आणि दिवसेंदिवस होत चाललेला अतिरेक, यावर भाष्य करण्यात आलं होतं. पंतप्रधान मोदींच्या वाराणसीतील सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क सुरक्षा यंत्रणांनी लोकांना उतरवायला सांगितले. दुसरीकडे अमित शहा यांच्या एका दौऱ्यात सुरक्षा यंत्रणांनी लोकांना घरांच्या दारे, खिडक्या बंद ठेवायला सांगितल्या. यावरुन हे भीतीचेच लक्षण नाही का?, असा सवाल करत कलियुग म्हणतात ते हेच का?, अशी विचारणा करण्यात आली होती.

(BJP Chitra Wagh Attacked Shivsena Sanjay Raut Over Saamana Editorial)

हे ही वाचा :

“मोदींच्या वाराणसीतील सभेत काळ्या टोप्या आणि काळे मास्क उतरवण्यात आले हे भीतीचेच लक्षण, कलियुग म्हणतात ते हेच का?”

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.