मुख्यमंत्रीसाहेब, आता तुमच्या कौशल्याची खरी गरज, ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का? : चित्रा वाघ

मु्ख्यमंत्रीसाहेब, आता तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आहे... ड्रायव्हिंग करत आपण कोकणात जाणार आहात का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारला आहे.

मुख्यमंत्रीसाहेब, आता तुमच्या कौशल्याची खरी गरज, ड्रायव्हिंग करत कोकणात जाणार आहात का? : चित्रा वाघ
चित्रा वाघ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jul 23, 2021 | 10:16 AM

मुंबई :  मु्ख्यमंत्रीसाहेब, आता तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची खरी गरज आहे… ड्रायव्हिंग करत आपण कोकणात जाणार आहात का?, असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारला आहे. कोकणात पावसाने अक्षरश: हैदोस माजवलाय. अनेक ठिकाणी पूर आलाय. गावच्या-गावं पुराच्या पाण्यात अडकलीत, अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने जाणार का? असा प्रश्न चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारलाय.

मुख्यमंत्रीसाहेब, आता तुमच्या कौशल्याची खरी गरज

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: गाडी चालवत मुंबईवरुन पंढरपूरवला गेले होते. त्यांच्या ड्रायव्हिंगवरुन विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्रही सोडलं. आता संपूर्ण कोकण पुराच्या पाण्यात असताना आणि खऱ्या अर्थाने लोकांना शासनाच्या मदतीची गरज असताना मुख्यमंत्री गाडी चालवून कोकणच्या दिशेने जाणार का?, असा खडा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय.

राज्याचे कुटुंबप्रमुख हे स्वत:ची जबाबदारी समजत स्वत: गाडी चालवत कोकणच्या दिशेने निघालेत का…… मुख्यमंत्री महोदय आता खरी गरज आहे तुमच्या ड्रायव्हिंग कौशल्याची, असं ट्विट करुन चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना परिस्थितीची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.

कोकणातल्या नद्यांना पूर, अनेक गावं पाण्याखाली

महाराष्ट्राच्या अनेक भागांत अक्षरशः ढगफुटी झाली आहे. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला आहे. कोकणातल्या अनेक नद्यांना पूर आलाय. चिपळूण, महाड, या भागांत पुराच्या पाण्याने थैमान माजवलंय.

मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हिंगवरुन विरोधकांची टीका

“मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही”, अशा शब्दात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या पंढरपूर दौऱ्यावर टीकास्त्र सोडलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वत: गाडी चालवत आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपूरला गेले होते. त्यावरुन भाजप नेते दररोज टीका करत आहेत. गुरुवारी गोपीचंद पडळकर यांनीही निशाणा साधला.

गोपीचंद पडळकर म्हणाले, “मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही. पण यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दरबारातही सुटत नाही. याच ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा महापालिका कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. जे आपल्या जीवाची पर्वा न करता पालिका कर्मचारी म्हणजे ‘कोविड वॅारीयर’ यांच्या सुरक्षा हमी अधिकारचं वाटोळं करायला हे ठाकरे सरकार निघालंय”

(BJP Chitra Wagh Slam Cm Uddhav Thackeray over konkan heavy Rain)

हे ही वाचा :

मुख्यमंत्री हा जनतेचा पालक असतो, गाडीचा चालक नाही, गोपीचंद पडळकरांची टीका

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.