“…तर आपल्या आई-बहि‍णींना फिरणंही मुश्किल होईल”, देवेंद्र फडणवीसांचे विधान, म्हणाले “नवनीत ताई…”

सत्तेवरून गेले की या सर्वांची आठवण होते आणि सत्तेवर हे लोक आले की तोंड मिटून ते गप्प बसतात", अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

...तर आपल्या आई-बहि‍णींना फिरणंही मुश्किल होईल, देवेंद्र फडणवीसांचे विधान, म्हणाले नवनीत ताई...
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 9:25 AM

Devendra Fadnavis In Amravati : “मला विश्वास आहे की, आपण पूर्ण ताकतीने मैदानात उतरल्यास यश आपल्यापासून दूर नाही. मग तो अमरावती जिल्हा असो की, वर्धा असो किंवा मग संपूर्ण महाराष्ट्र. राज्यातील सर्व जागा महायुती जिंकू शकते, अशा प्रकारची हवा राज्यात आहे. केवळ तुमच्या मनाचा निर्धार आणि जिंकण्याची उर्मी तुमच्यात पाहिजे”, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते अमरावतीत बोलत होते.

“विरोधी पक्षातील लोक सत्तेत आले तर केवळ पैसा जमा करतात. मात्र, सत्ता गेली की यांना गरीब, शेतकरी, कष्टकरी आठवतो. तुम्ही गेली 60-70 वर्ष तुम्ही राज्यात सत्ता उपभोगली, यावेळी तुम्हाला शेतकरी, कष्टकरी का आठवला नाही? तुम्हाला शेतमजूर, गरीब का आठवला नाही? तुम्हाला एससी, एसटी समाज का आठवले नाहीत? सत्तेवरून गेले की या सर्वांची आठवण होते आणि सत्तेवर हे लोक आले की तोंड मिटून ते गप्प बसतात”, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत नवनीत राणा यांच्या पराभवाबद्दलही भाष्य केले. “त्यावेळी खूप मोठ्या मोठा रांगा लागल्या होत्या. अमरावतीत नवनीत ताई, तुम्ही पडल्याचं दु:ख सर्वांना झालं. पण काही लोकांना फार आनंद झाला. राजकमल चौकात त्या सर्वांनी काय केलं, हे आपण सर्वांनी पाहिलं. अरे वेड्यांनो आता जागे झाला नाहीत ना, तर तुम्हाला बाहेर फिरता येणार नाही, हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवायला हवं. हे जर सहन करत राहिलात तर आपल्या आई-बहि‍णींना फिरणं मुश्किल होईल”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आता फक्त मैदानात उतरा”

“आपण जर मैदानात उतरलो तर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. काहीजण सत्तेत आले की पैसे कमावतात आणि सत्ता गेली की, यांना गरीब आठवतात. सत्ता गेली की यांचे पोपट बोलायला लागतात. यांना सत्ता फक्त पैशासाठी पाहिजे, आता फक्त मैदानात उतरा”, असे आवाहनही देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केले.

“मी पुन्हा एकदा तुमचं सरकार आणून दाखवेन”

“ज्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने जिंकण्याची उर्मी आहे आणि पुन्हा एकदा आपण पूर्ण ताकतीने जर का मैदानात उतरलो, तसेच तुमच्या सारखे मावळे जर आमच्या सोबत असतील तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा तुमचं सरकार मी आणून दाखवेलच”, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीसांनी दिले.

'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला
'तरूणांना वाटतं ही पहिलीच संधी अन् वयस्करांना...', अजित पवारांचा टोला.
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?
विधानसभेत महायुती आणि मविआला नेमक्या किती जागा? लोकपोलचा सर्व्हे काय?.
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO
विरोधकांवर टीका करणाऱ्या अमोल मिटकरींमधला गायक पाहिलाय का? बघा VIDEO.
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?
'बिहार पॅटर्न राबवा, मला CM पद द्या...', शाहांसमोर दादांचा प्रस्ताव?.
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले
लाडकी बहीण नेमकी कोणाची? योजनेच्या श्रेयवादावर अजित दादा स्पष्टच बोलले.
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब
'देवा भाऊं'चे झळकले बॅनर, 'लाडकी बहीण'च्या बॅनरवरून दादांचा फोटो गायब.
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय...
भुजबळांनी दिलेल्या चॅलेंजवर जरांगे यांचा पलटवार; म्हणाले, १ लाख काय....
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं
त्यांनीच माझा भाजप प्रवेश रोखला; खडसेंनी घेतली 'या' दोन नेत्यांची नावं.
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?
शिवरायांचं राज्य तेव्हा किती होतं?, मोहन भागवत यांनी काय दिला दाखला?.
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी
सोमय्या सक्रिय होणार, विधानसभेच्या तोंडावर पक्षाकडून मोठी जबाबदारी.