AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावचा पराभव भाजपच्या जिव्हारी, बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी तब्बल 30 हजार पानांची याचिका

भारतीय जनता पक्षाचे (BJP) 27 नगरसेवक जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत फुटले होते. (BJP Rebel Corporator Mayor Election)

जळगावचा पराभव भाजपच्या जिव्हारी, बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेसाठी तब्बल 30 हजार पानांची याचिका
उद्धव ठाकरे , गिरीश महाजन
| Updated on: Mar 31, 2021 | 5:53 PM
Share

जळगाव: भारतीय जनता पक्षाचे (BJP) 27 नगरसेवक जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत फुटले होते. भाजपनं फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पक्षातर्फे नाशिक विभागीय आयुक्तांकडे तब्बल तीस हजार पानांची याचिका दाखल केली आहे. लवकरच त्याची सुनावणी होणार आहे. जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी नुकतीच ऑनलाईन निवडणूक झाली. यामध्ये बहुमत नसतानाही शिवसेनेने भाजपचे तब्बल 27 नगरसेवक फोडून महापलिकवर आपला महापौर, उपमहापौर निवडून आणला. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकरणात खळबळ उडाली. (BJP file thirty thousand pages plea at divisional commissioner Nashik against rebel corporators in Mayor Election)

27 नगरसवेक फुटल्यानं भाजपवर नामुष्की

भारतीय जनता पक्षाला नामुष्की पत्करावी लागली राज्यातील नगरसेवकाची ही मोठी फूट ठरली आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी या फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. फुटलेल्या नगरसेवकना अपात्र ठरवण्याची कारवाई करावी, भाजपकडून आज नाशिक विभागीय आयुक्तांकडे याचिका दाखल करण्यात आली आहे.ही याचिका तब्बल तीस हजार पानांची असल्याचे सांगण्यात आले.

महापालिकांच्या इतिहासातील मोठी याचिका

जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते भगत बालानी, यांनी ही याचिका दाखल केली आहे नगरसेवकांनी ऑनलाईन केलेले मतदान,असे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे या फुटीर नगरसेवकांवर निश्चित कारवाई होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाने दाखल केलेली तीस हजार पानांची याचिका राज्यातील महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच याचिका आहे. त्यामुळे या याचिकेवर काय निकाल लागतो या कडे राज्याचे लक्ष असणार आहे.

भाजपच्या नगरसेवकांची बंडखोरी शिवसेनेचा महापौर

जळगाव महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने भाजपच्या नाकावर टिच्चून विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी भाजपच्या 27 नगरसेवकांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे विजय संपादित केला. त्यामुळे महापौरपदी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांचा विजय झाला. या निवडणुकीत बहुमतसाठी 38 मतांची गरज होती. जयश्री महाजन यांनी 45 मते मिळाली. तर भाजपच्या प्रतिभा कापसे यांना 28 मते मिळाली. तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी बाजी मारली.

संबंधित बातम्या:

शिवसेनेचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी; जळगावात भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेचा महापौर

सांगली महापौर निवडणूक : व्हीप डावलून राष्ट्रवादीला मतदान, भाजप सात नगरसेवकांवर कारवाई करणार

(BJP file thirty thousand pages plea at divisional commissioner Nashik against rebel corporators in Mayor Election)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.