मोदी वाराणसीतूनच, महाराष्ट्रात प्रितम मुंडे आणि पूनम महाजनांचं नाव निश्चित?

मोदी वाराणसीतूनच, महाराष्ट्रात प्रितम मुंडे आणि पूनम महाजनांचं नाव निश्चित?

नवी दिल्ली : भाजपची लोकसभा निवडणुकीसाठी अजून एकही यादी जाहीर झालेली नाही. भाजपच्या केंद्रीय निवड समितीला उमेदवारांची नावं निश्चित करताना दुसऱ्या बैठकीतही अडचणी येत असल्याची माहिती आहे. पण काही नावांवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील नावांचा समावेश आहे. तर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी हे यावेळी निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता आहे. आपण निवडणूक लढणार नसल्याचं सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वीच जाहीर केलं होतं.

उत्तर प्रदेशातील संभावित नावं

पंतप्रधान नरेंद्र मोदी – वाराणसी

लखनौ- राजनाथ सिंह

गाझियाबाद- व्हीके सिंह

नोएडा- महेश शर्मा

अमेठी- स्मृती ईराणी

चंदौली- महेंद्र पांडेय

गाजीपूर किंवा बलिया- मनोज सिन्हा

कानपूर – मुरली मनोहर जोशी यांच्या जागी सतीश महाना

भदोही- वीरेंद्र सिंह

अमरोहा – कंवर सिंह तंवर

आग्रा- रमाशंकर कठेरिया

मथुरा- हेमा मालिनी

बागपत- सत्यपाल

फतेहपूर सीक्री- नवीन जैन

केसरगंज- बृजभूषण शरण

बरेली- संतोष गंगवार

एटा- राजवीर सिंह

गोंडा- कीर्ति वर्धन

कौशांबी- विनोद सोनकर

महाराजगंज- पंकज चौधरी

मेरठ- राजेंद्र अग्रवाल

सहारनपूर- राघव लखनपाल

शाहजहांपूर- कृष्णा राज

महाराष्ट्रातील संभावित नावे

बीड – डॉ. प्रितम मुंडे

मुंबई उत्तर मध्य – पूनम महाजन

मुंबई उत्तर पूर्व – किरीट सोमय्या

Published On - 10:34 pm, Tue, 19 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI