सनी देओलचा उमेदवारी अर्ज दाखल, खरं नाव समोर, संपत्ती किती?

चंदीगड (पंजाब) : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करत, पंजाबमधील गुरुदासपूर येथील लोकसभेचं तिकीटही मिळवलं. सोमवारी म्हणजे 29 एप्रिल रोजी गुरुदासपूरमधून सनी देओलने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सनी देओलने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रासोबत संपत्तीची माहितीही सादर केली. सनी देओलके नेमकी किती संपत्ती आहे, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. अभिनेता सनी देओलचे […]

सनी देओलचा उमेदवारी अर्ज दाखल, खरं नाव समोर, संपत्ती किती?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:56 PM

चंदीगड (पंजाब) : हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलने काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करत, पंजाबमधील गुरुदासपूर येथील लोकसभेचं तिकीटही मिळवलं. सोमवारी म्हणजे 29 एप्रिल रोजी गुरुदासपूरमधून सनी देओलने उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी सनी देओलने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रासोबत संपत्तीची माहितीही सादर केली. सनी देओलके नेमकी किती संपत्ती आहे, याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.

अभिनेता सनी देओलचे खरे नाव ‘अजय सिंह’ आहे. सनी देओलने प्रतिज्ञापत्रात या संबंधी ठळकपणे उल्लेख केला आहे. भारतासह जगभरातील सिनेरसिक मात्र त्याला ‘सनी देओल’ या नावानेच ओळखतात. मात्र, त्याचे खरे नाव वेगळे असल्याचे प्रतिज्ञपत्रातून समोर आले आहे.

निवडणूक आयोगासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील संपत्तीच्या विवरणानुसार, सनी देओलकडे 87 कोटी 18 लाख रुपयांची एकूण संपत्ती आहे. सनी देओलची जंगम मालमत्ता 60 कोटी 46 लाख रुपयांची, तर स्थावर मालमत्ता 21 कोटी रुपयांची आहे. तसेच, 50 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचेही सनी देओलने प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

वर्षनिहाय उत्पन्न :

  • 2017-18 : 63 लाख 82 हजार रुपये
  • 2016-17 : 96 लाख 29 हजार रुपये
  • 2015-16 : 2 कोटी 25 लाख

सनी देओलकडे 26 लाख रुपयांची, तर पत्नीकडे 16 लाख रुपयांची कॅश आहे. 1 कोटी 69 लाख रुपयांची वाहनं सनी देओलकडे आहेत. मात्र, नेमक्या कोणत्या गाड्या त्याच्याकडे आहेत, याबाबत प्रतिज्ञापत्रातून विस्तृत माहिती देण्यात आली नाही.

पत्नीकडे 1 कोटी 56 लाखांचे दागिने आहेत, मात्र सनी देओलकडे दागिने नाहीत, असेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

गुरुदासपूरमधून सनी देओल रिंगणात

अभिनेता सनी देओलने काही दिवसांपूर्वीच संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काही तासातच सनी देओलला पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीही घोषित करण्यात आली. दिवंगत अभिनेते विनोद खन्ना हे गुरुदासपूरमधून भाजपचे खासदार होते.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.