AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2050 ला मुंबई मुस्लिम कट्टरतावाद्याच्या ताब्यात असेल, रिपोर्टचा हवाला देऊन भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

"महापौरपदासाठी भाजप लढत नाही. जे नेते महापौर,महापौर म्हणत आहेत, त्यांना पण मी सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, त्यांना आवरा. कसली कॉलर टाइट? कसलं महापौर पद? आमच्या डोळ्यासमोर मुंबई आहे, कोविडच्या काळात ठाकरे सेना कमाई करत होती. खिचडी, रेमडेसिवर घोटाळा आम्हाला महापालिका भ्रष्टाचार मुक्त करायची आहे. विकसित करायची आहे, हे आमचं लक्ष्य आहे" असं किरीट सोम्मया म्हणाले.

2050 ला मुंबई मुस्लिम कट्टरतावाद्याच्या ताब्यात असेल, रिपोर्टचा हवाला देऊन भाजप नेत्याचा खळबळजनक दावा
kirit Somaiya
| Edited By: | Updated on: Dec 10, 2025 | 2:27 PM
Share

चालू अधिवेशनामध्ये बोगस जन्म प्रमाणपत्र हा विषय चर्चेला आला पाहिजे. आमदार प्रवीण दरेकर ,प्रसाद लाड आणि निरंजन डावखरे यांना या बाबत माहिती दिली आहे. विषय पटलावरती यायला हवा. “महाराष्ट्रामध्ये दोन लाखाहून अधिक जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल मध्ये देखील असंच घडत आहे. 367 बोगस जन्म प्रमाणपत्र बाहेर काढले. अनेक एजंट लोकांना पैसे द्यावे लागतात. मुंबईला बांग्लादेशी मुक्त करणार” असं भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं. “टाटा इन्स्टिट्यूटने गेल्या वर्षी एक रिसर्च केला. त्या पेपरमध्ये लिहिलं आहे की, 2050 ला मुंबई मुस्लिम कट्टरतावाद्याच्या ताब्यात असणार. हिंदूंची लोकसंख्या 51% टक्के असेल आणि मुस्लिम म्हणजे 31% टक्के असणार. हे आंतरराष्ट्रीय इस्लामिक संघटनेचं षडयंत्र आहे आणि ते थांबवायला हवे” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.

“नाराजीचा प्रश्न कुठे आला?. माझ्या कामाचं तुम्हीच लोक कव्हरेज करत आहात. ठाकरेंना ठोकलं ना कुठल्या पत्रकाराची, राजकीय लोकांची आणि पोलिसांची हिंमत नव्हती. मी केलं ना, मातोश्रीमध्ये कसा पैसा जातो, पुढच्या आठवड्यात आणखी कोविडची कमाई यावर देखील मी सर्व कागदपत्र रिलीज करणार. मी नाराज असण्याचा प्रश्न नाही” असं किरीट सोमय्या म्हणाले.

तुमच्या पेक्षा शंभर पट काम मी करतो

“ठाकरेंची उद्धट गिरी ही ठीक आहे. परंतु पक्षातले काही नेते यांनी पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, एवढाच माझा मुद्दा आहे. पद असलं तरच माणूस काम करतो, ज्याच्यामुळे त्यांना वाईट वाटतं असेल. मुंबई अध्यक्षांना मी फार कटू कट्टर शब्द सांगितला आहे, तुम्हाला माहित आहे की तुमच्या पेक्षा शंभर पट काम मी करतो. काम दुप्पटच करणार आहे, म्हणून पद नको” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. “2019 साली सर्व जगाला माहित आहे की, उद्धव ठाकरे सेनेने अट ठेवली किरीट सोमय्या नको, ठीक आहे. या अगोदर देखील अनेक वर्ष खासदार नव्हतो. पक्षावर माझा विश्वास आहे” असं किरीट सोमय्या म्हणाले.

दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?
दानवेंच्या व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती खरंच शिवसेनेचा आमदार?.
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध..
दमानियांचे ते आरोप खोटे? निलेश मगर म्हणाले त्या व्यवहाराशी माझा संबध...
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर
सामंत गुगली टाकण्यात हुशार, थातुरमातुर.... प्रकाश सुर्वेंचा घरचा आहेर.
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद
विधानसभेत आसन व्यवस्थेवरून ठाकरेंची सेना अन् काँग्रेसमध्ये वाद.
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट...
संदीप देशपांडेंकडून सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचार उघड, थेट....
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?
भास्कर जाधव विधानसभेत भडकले अन् कामकाजावरच आक्षेप, नेमकं घडलं काय?.
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?
तेव्हा अजित पवारांची सत्ता नव्हती, पण आता तर... दमानियांचा दावा काय?.
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा
फडणवीस तेव्हा हुडी घालून मला.. शिंदेंनी सांगितला सेनाफुटीवेळीचा किस्सा.
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा
कराड जामिनावर सुटल्यास...व्हायरल ऑडिओनंतर जरांगेंचा थेट सरकारलाच इशारा.
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्...
मातृत्वाला काळीमा... जन्मदात्या आईकडूनच पोटच्या 6 मुलांचा सौदा अन्....