AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan : तुमच्याशी दुश्मनी झाली तरी फरक पडत नाही म्हणणाऱ्या सयाजी शिंदेंना गिरीश महाजनांच उत्तर

Girish Mahajan : "विजय केनवडेकरांनी स्पष्ट सांगितलं आहे हे माझे व्यवसायाचे पैसे होते. केनवडेकर यांच्यावर झालेला प्रकार ट्रॅप होता. केनवडेकर निवडणूक आयोगासमोर स्पष्टीकरण देणार. ज्या ठिकाणी महायुती नाही आहे, त्यामुळे अशा ठिकाणी केसरकर आवाहन करत असतील. कोणाच्या तोंडाला बंधन लावता येत नाही" असं गिरीश महाजन म्हणाले.

Girish Mahajan : तुमच्याशी दुश्मनी झाली तरी फरक पडत नाही म्हणणाऱ्या सयाजी शिंदेंना गिरीश महाजनांच उत्तर
Sayaji Shinde-Girish Mahajan
| Updated on: Nov 29, 2025 | 4:03 PM
Share

नाशिकच्या तपोवनमध्ये साधूग्रामसाठी झाडं तोडण्याचा मुद्दा तापला आहे. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. त्यासाठी तपोवनमधील झाडं तोडण्यात येतील. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे कुंभमेळ्याच्या विकास कामांची जबाबदारी आहे. गिरीश महाजन या मुद्यावर म्हणाले की, “ही जागा साधूग्रामसाठी रिझर्व आहे. ही जागा कोणाच्या घशात घालण्याच्या प्रश्नच येत नाही. उलट राईचा पर्वत करायचं काम कोणीही करू नये” राज ठाकरे यांच्या प्रश्नाला गिरीश महाजनांचे प्रत्युत्तर. “वृक्षप्रेमी तपोवनात आलेत. त्यांनी राग व्यक्त केला. मात्र कुंभमेळा बारा वर्षात एकदा येतो. वृक्ष तोडणीच्या बाबतीत सरकारची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही वृक्षप्रेमी आहोत” असं गिरीश महाजन म्हणाले.

“काही झाड काढणार आहोत. एका झाडाला दहा झाड लावणार. हजार झाड काढणार असून त्याच्या बदलत 15000 झाडं लावणार. झाडे लावण्याचे काम सुरू झाले असून हैदराबादवरून झाडं आणणार आहोत. आम्ही लावणार असलेल्या झाडांमुळे जंगल वाढणार आहे” असं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. “सरसकट झाड तोडत नाही आहोत. झाडं तोडून त्या ठिकाणी रेस्टॉरंट बांधणार नाही” असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.

सयाजी शिंदेंना काय उत्तर दिलं?

“गिरीश महाजन उत्तर द्या. गिरीश महाजन तुम्ही जबाबदार माणूस आहात. तुमची-माझी काही दुश्मनी नाही आणि झालीच तरी काही फरक पडत नाही” असं सयाजी शिंदे म्हणाले. त्यावर गिरीश महाजन म्हणाले की, “सयाजी शिंदे यांच्या समाधान झाल्यानंतर आम्ही झाडं लावू. आम्ही असं म्हणत नाही आहोत, की आम्ही लावून टाकू, करून टाकू, आम्ही आधी लावू मग तुम्ही आम्हाला सांगा,काय करायचं?” असं गिरीश महाजन म्हणाले.

नारायण राणे यांना संपवण्याच्या आरोपावर काय म्हणाले?

“नारायण राणे साहेब आमच्यासाठी आदरणीय आहेत. त्यांनी केंद्रात देखील काम केलेलं आहे. राणेसाहेब भाजप बद्दलच बोलतात. कुठेही त्यांना संपवण्याचे काम होत नाही आहे. राणे साहेबांची मुलं मोठी झाली आहेत. मात्र राणेसाहेब पक्षाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित असतात. एखाद्या ठिकाणी आले नसतील तर ते नाराज आहेत. त्यांना संपवण्याचे काम सुरू आहे असं समजण्याचं काम अजिबात नाही” असं गिरीश महाजन म्हणाले.

नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.