ठाकरे सरकारकडून सुरक्षाकपात, नारायण राणेंना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच

ठाकरे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर मोदी सरकारकडून नारायण राणेंना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.  (Narayan Rane Provide Y Grade Security By Modi Government)  

  • राहुल झोरी, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 16:10 PM, 20 Jan 2021
ठाकरे सरकारकडून सुरक्षाकपात, नारायण राणेंना आता थेट मोदी सरकारकडून CISF कवच
नारायण राणे

मुंबई : भाजप नेते नारायण राणे यांना केंद्राने Y दर्जाची सुरक्षा प्रदान केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारने राणेंना Y दर्जाची सुरक्षा दिली आहे. ठाकरे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर मोदी सरकारकडून नारायण राणेंना सुरक्षा देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांसह इतर भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली होती. यानंतर राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. (Narayan Rane Provide Y Grade Security By Modi Government)

राज्य सरकारकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा दिली जात होती. मात्र काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या नव्या निर्णयानुसार ही सुरक्षा रद्द करण्यात आली होती.  ठाकरे सरकारनं सुरक्षा काढल्यानंतर मोदी सरकारकडून नारायण राणेंना सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.

नारायण राणे यांना केंद्राकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने ही सुरक्षा दिली आहे. या सुरक्षेव्यवस्थेनुसार 12 सी. आय. एस. एफचे जवान राणेंच्या सुरक्षा ताफ्यात तैनात असणार आहे.  महाराष्ट्र सरकारनं भाजपच्या अनेक नेत्यांची सुरक्षा काढल्यानंतर आता थेट केंद्राकडून सुरक्षा दिली गेली आहे. येत्या काळात भाजपच्या इतरही नेत्यांना सुरक्षा देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती.

वाय (Y) प्रकारची सुरक्षा व्यवस्था

तिसऱ्या क्रमांकाची ही सुरक्षा व्यवस्था आहे. महत्त्वाचे असणारे मात्र तुलनेने कमी धोका असेलेल्या व्यक्तींना वाय श्रेणीची सुरक्षा दिली जाते. या व्यवस्थेत एकूम 11 सुरक्षा रक्षक असतात. ज्यामध्ये दोन प्रशिक्षित जवान असतात.

‘या’ नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत बदल

>  विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पत्नी अमृता फडणवीस, मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची सुरक्षा महाराष्ट्र सरकारने कमी केली होती.

>  फडणवीसची सुरक्षा झेड + होती ती आता वाय + केली होती.

>  अमृता फडणवीस यांची सुरक्षा अगोदर वाय + ती आता एक्स केली.

>  देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात यानंतर बुलेटप्रूफ कार नाही.

>  राज ठाकरे यांच्याकडे पूर्वी झेड सुरक्षा होती. जी आता Y + करण्यात आली.

>  रामदास आठवलेंची वाय + सुरक्षा आत्ता विना एस्कॉर्टशिवाय असेल.

>  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि खासदार नारायण राणे यांच्याकडे वाय + सुरक्षा होती जी आता रद्द करण्यात आली होती.

          >  भाजप नेते आशिष शेलार यांना वाय + सुरक्षा होती. ती आता वाय करण्यात आली होती.

(Narayan Rane Provide Y Grade Security By Modi Government)

संबंधित बातम्या : 

फडणवीस, राज ठाकरे, चंद्रकांतदादांच्या सुरक्षेत कपात; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

वरुण सरदेसाईंच्या सुरक्षा व्यवस्थेवरुन आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला