…तर ठाकरेंची अब्रु रस्त्यावर आणायला विनायक राऊत जबाबदार असतील; राऊतांच्या कोंबडीचोर टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर

आता शिवसेना नेते खासदार विनायक राऊत आणि भाजप नेते निलेश राणे आमने-सामने आले आहेत. विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. या टीकेला निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

...तर ठाकरेंची अब्रु रस्त्यावर आणायला विनायक राऊत जबाबदार असतील; राऊतांच्या कोंबडीचोर टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 8:10 AM

मुंबई :  सध्या शिंदे गट, भाजप  आणि शिवसेना यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचं पहायला मिळत आहे. आता शिवसेना नेते खासदार विनायक राऊत आणि भाजप नेते निलेश राणे आमने-सामने आले आहेत. विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. राऊत यांच्या या टीकेला आता निलेश राणे (Nilesh Rane) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी नारायण राणे (Narayan Rane) यांचा कोंबडीचोर असा उल्लेख केला आहे. त्यानंतर निलेश राणे यांनी विनायक राऊतांच्या टीकेचा जोरदार समाचार घेतला आहे.  ठाकरेंची अब्रु रस्त्यावर आणायला राऊत जबाबदार असतील असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.

विनायक राऊत यांनी नेमकं काय म्हटलं?

विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी नारायण राणे यांचा उल्लेख कोंबडीचोर असा केला आहे. शिवसेना जेव्हा स्थापन झाली तेव्हा उद्धव ठाकरे हे सहा वर्षांचे होते, तर नारायण राणे हे चेंबूरच्या नाक्यावर कोंबडी कापत हेते. हा या दोघांमधील फरक आहे.  असं म्हणतात तिथे असलेल्या टॉकिजमध्ये तिकीट ब्लॅक करणं, कोंबड्यांच्या माना कापणं, म्हणून त्यांचं नाव कोबंडीचोर पडलं अशी घणाघाती टीका राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर केली आहे.

हे सुद्धा वाचा

निलेश राणेंकडून राऊतांच्या टीकेचा समाचार

निलेश राणे यांनी राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  कलानगरच्या सम्राटाने घरातील कोंबडी कशी चोरली?, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच ठाकरेंची अब्रु रस्त्यावर आणायला राऊतच जबाबदार असतील, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.