एकनाथ खडसेंनी स्वत: केलेल्या उद्योगांचा विचार करावा, भाजपचा पहिला थेट हल्ला

एकनाथ खडसेंचा उपयोग राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या विकासासाठी करावा," असा टोलाही भाजपने राष्ट्रवादीला लगावला आहे. (BJP Prasad Lad comment on Eknath Khadse NCP Entry) 

एकनाथ खडसेंनी स्वत: केलेल्या उद्योगांचा विचार करावा, भाजपचा पहिला थेट हल्ला
Follow us
| Updated on: Oct 23, 2020 | 1:29 PM

रत्नागिरी : एकनाथ खडसेंना मंत्रिपद मिळावं. फक्त भाजपवर आरोप करण्यासाठी त्यांना पक्षात घेतलं जाऊ नये, अशी खोचक टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली आहे. खडसेंनी आरोप करताना स्वतः केलेले उद्योग काय होते, त्याचा विचार करावा, असा थेट हल्लाही प्रसाद लाड यांनी केला आहे. (BJP Prasad Lad comment on Eknath Khadse NCP Entry)

“खडसेंनी आरोप करताना स्वतः केलेले उद्योग काय होते त्याचा विचार करावा. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीसांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. भाजपवर आरोप करण्यापेक्षा खडसेंनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे,” असेही प्रसाद लाड म्हणाले.

भाजपमध्ये एकाधिकारीशाही आहे या एकनाथ खडसेंच्या आरोपाला प्रसाद लाड यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. प्रसाद लाड यांनी एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीच्या प्रवेशाबद्दल शुभेच्या देत त्यांनी केलेल्या आरोपांना देखील चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

“आरोप करण्यासाठी खडसेंचा वापर होऊ नये” 

“एखाद्याची स्वप्न जर त्याच्या इच्छेच्या पुढे जात असतील तर त्याला आळा घालू शकत नाही, असा मार्मिक टोलाही एकनाथ खडसेंनी लगावला आहे. आरोप करणं सोपं असतं पण ते सिद्ध करणं त्यापेक्षा कठीण असते. फक्त भाजपवर किंवा पक्षातील एका नेतृत्वावर आरोप करण्यासाठी एकनाथ खडसेंचा वापर होऊ नये. एकनाथ खडसेंचा उपयोग राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या विकासासाठी करावा,” असा टोलाही प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

“खडसे ज्या पक्षात चाललेत त्या पक्षाचा पूर्व इतिहास आणि पक्षातील एकाधिकारशाही अनुभवावी. त्यानंतर जनतेसमोर यावं,” असा सल्लाही प्रसाद लाड यांनी दिला.

भाजप पक्षात एकाधिकारशाही नाही. भाजप पक्ष खडसेंना जास्त माहिती आहे. त्यामुळे खडसे ज्या पक्षात जात आहेत तिथं एकाधिकारशाही काय असते ते लवकरच समजेल असा खोचक सल्लाही लाड यांनी नाथाभाऊंना दिला आहे. (BJP Prasad Lad comment on Eknath Khadse NCP Entry)

संबंधित बातम्या : 

कोणी पद देणार म्हणून नाथाभाऊ पक्षप्रवेश करत नाही : एकनाथ खडसे

एकट्या फडणवीसांमुळं पक्ष चालत नाही, भाजपमध्ये कुठलाही निर्णय सामूहिकरित्या- दानवे

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.