AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“त्यांच्याच माणसांनी मुलाखत घ्यायची, उत्तरही त्यांनींच द्यायचे, हा ठाकरे सरकारचा कारभार”,भाजपची टीका

भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सामनासाठी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतींवरुन टीका केली. Uddhav Thackeray Ravindra Chavan

त्यांच्याच माणसांनी मुलाखत घ्यायची, उत्तरही त्यांनींच द्यायचे, हा ठाकरे सरकारचा कारभार,भाजपची टीका
Yuvraj Jadhav
Yuvraj Jadhav | Updated on: Nov 30, 2020 | 6:19 PM
Share

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकरानं एक वर्ष पूर्ण केल्यानंतर भाजपकडून ठिकठिकाणी पत्रकार परिषदा घेत राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे. भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सामनातील मुलाखतीवरुन उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे.  ‘सामना आणि इतर माध्यमांतून त्यांच्याच वृत्तपत्रात त्यांच्याच माणसांनी मुलाखती घ्यायच्या.त्यांचे त्यांनीच प्रश्न विचारायचे,त्यांनीच उत्तरे द्यायची.स्वतःच्या कार्यकर्त्यांकडून पाठ थोपटून घ्यायची. हा अशा प्रकारचा ठाकरे सरकारचा एक वर्षाचा कारभार आहे, असा टोला माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी लगावला आहे. (BJP leader Ravindra Chavan criticize Uddhav Thackray Government)

‘मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह करायचे, त्यात त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फार छान अशा कमेंट्स करायच्या.आणि हे लोकांपर्यंत न्यायचं.अशा पद्धतीचा कारभार या एक वर्षात या सरकारने केला आहे, असा उपरोधिक टोला ही चव्हाण यांनी लगावला आहे.

महाराष्ट्र सरकारच्या एक वर्षपूर्तीबद्दल भाजपकडून राज्यात पत्रकार परिषदा घेऊन सरकारचा लेखाजोखा मांडला गेला.कणकवली मध्ये रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन या निमित्ताने सरकारवर निशाणा साधला, यावेळी भाजप आमदार नितेश राणे उपस्थित होते. (BJP leader Ravindra Chavan criticize Uddhav Thackray Government)

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास तीन महिन्यात आरक्षण : नितेश राणे

“इतरांच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे शंभर मार्ग आहेत. हे मार्ग अवलंबल्याने मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेल. मात्र, मराठा आरक्षण देण्याची राज्य सरकारची इच्छाशक्ती नाही. खासदार उदयनराजे यांच्याप्रमाणे मीही सांगतो. लवकरात लवकर तुम्ही जर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवले तर तीन महिन्यात आरक्षण देण्याची जबाबदारी आमची,” असं आमदार नितेश राणे म्हणाले. तसेच,

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे यांनी राज्य सरकारला चांगलंच फैलावर घेतलं. त्यांनी ठाकरे सरकारला मराठा समाजाला अरक्षण देण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप केला. तसेच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं तर तीन महिन्यांत आम्ही मराठा समजाला टिकेल असं आरक्षण देऊ असा दावा केला. तसेच, हे चोरांचं सरकार आहे. महाविकास आघाडीला मराठा समाजाला त्रास द्यायचा आहे  असे म्हणत प्रामाणिकपणे आरक्षण पाहिजे असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुंख्यमंत्री करणे ही एकच अट असल्याचंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या :

फडणवीसांना मुख्यमंत्रिपद द्या, तीन महिन्यांत मराठा आरक्षण देण्याची जबाबदारी आमची, नितेश राणेंचा दावा

‘मुख्यमंत्र्यांची भाषा उर्मट, पदाला साजेसं वक्तव्य करावं’, निरंजन डावखरेंचा हल्लाबोल

(BJP leader Ravindra Chavan criticize Uddhav Thackray Government)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...