केवळ मंत्रीपदांसाठी वाद सुरू, वरिष्ठ नेते मार्ग काढतील : सुभाष देशमुख

माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांनी (Subhash Deshmukh on BJP Shivsena dispute) भाजप-शिवसेना वाद केवळ मंत्रिपदासाठी असल्याचं म्हटलं आहे.

केवळ मंत्रीपदांसाठी वाद सुरू, वरिष्ठ नेते मार्ग काढतील : सुभाष देशमुख

सोलापूर: माजी सहकार मंत्री आणि भाजप नेते सुभाष देशमुख यांनी (Subhash Deshmukh on BJP Shivsena dispute) भाजप-शिवसेना वाद केवळ मंत्रिपदासाठी असल्याचं म्हटलं आहे. जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री आणि जागांच्या तुलनेत मंत्रिपदे हा भाजप आणि शिवसेनेचा जुना फॉर्म्युला आहे. सध्याचा वाद केवळ मंत्रिपदांसाठी आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी यात लक्ष घातलं आहे. लवकरच यावर तोडगा निघून महायुतीचा मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा सुभाष देशमुख (Subhash Deshmukh on BJP Shivsena dispute) यांनी केला आहे. तसेच शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यास जनतेचा घोर अपमान होईल, असंही ते म्हणाले.

सुभाष देशमुख म्हणाले, “राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. मुख्यमंत्रीपदाचा दावा शिवसेनाही करते आहे आणि भाजपही करते आहे. अमित शहा यांच्यासोबत काय ठरलं हे मी सांगू शकत नाही. मात्र जुना फॉर्म्युला बघितला, तर ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री आणि जागांच्या तुलनेत मंत्रीपद असा होता. आता दोन्ही बाजूने मार्ग निघाला, तर राज्यातील जनतेला न्याय दिल्यासारखं होईन. हा वाद केवळ मंत्रिपदांसाठी आहे. वरिष्ठ नेत्यांनी यात लक्ष घातलं असून लवकरच मार्ग निघेल. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगेससोबत जातील असं मला वाटतं नाही. मात्र, तसं झालं तर तो महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान होईन.”

जनतेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात महायुतीला कौल दिला आहे. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं स्वाभाविक आहे. मात्र यात काहीना काही मार्ग निघेल, असंही देशमुख यांनी नमूद केलं.

अमित शहा आणि कंपनी खोटारडे असल्याच्या उद्धव ठाकरे यांच्या आरोपांवर देशमुख म्हणाले, “अमित शाह यांच्यासी काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही. मात्र, आजपर्यंतचे अनुभव पाहिले, तर ते जे बोलतात ते करण्याचा प्रयत्न करतात.”

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI